काेविड रूग्णांसाठी चादरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:56+5:302021-06-05T04:23:56+5:30
बियाणाचा तुटवडा उस्मानाबाद -जून उजाडताच जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस पडला. त्यामुळे काही भागात पेरणीही सुरू झाली आहे. असे ...
बियाणाचा तुटवडा
उस्मानाबाद -जून उजाडताच जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस पडला. त्यामुळे काही भागात पेरणीही सुरू झाली आहे. असे असतानाच सध्या बाजारपेठेत साेयाबीन बियाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वाहतूक काेंडी नित्याचीच
तेर - उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जुने बसस्थानक परिसरात वाहतूक काेंडी नित्याचीच बनली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. या प्रश्नाकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून हाेत आहे.
गाेराेबा कदम यांना निराेप
लाेहारा -येथील पाेलीस ठाण्यातील पाेउपनि म्हणून कार्यरत असलेले गाेराेबा कदम हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते.
पुलाचे काम सुरू
उस्मानाबाद - औरंगाबाद-साेलापूर राष्ट्रीय महामार्गाला जाेडलेल्या जुना उपळा रस्त्यावरील पुलाचे काम रखडले हाेते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना गैरसाेयीचा सामना करावा लागत हाेता. अखेर या पुलाच्या कामास गुरूवारपासून सुरूवात झाली आहे.