बोर्डा ग्रामपंचायतीवर शेळके, चव्हाण बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:28 AM2021-02-15T04:28:45+5:302021-02-15T04:28:45+5:30

सहा जागा जिंकून ग्रामविकास आघाडीने मिळविली सत्ता कळंब : तालुक्यातील बोर्डा येथील सरपंचपदी आशाताई व्यंकट शेळके यांची तर उपसरपंचपदी ...

Shelke, Chavan unopposed on Borda Gram Panchayat | बोर्डा ग्रामपंचायतीवर शेळके, चव्हाण बिनविरोध

बोर्डा ग्रामपंचायतीवर शेळके, चव्हाण बिनविरोध

googlenewsNext

सहा जागा जिंकून ग्रामविकास आघाडीने मिळविली सत्ता

कळंब : तालुक्यातील बोर्डा येथील सरपंचपदी आशाताई व्यंकट शेळके यांची तर उपसरपंचपदी प्रणव विजयेंद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीवर सलग तिसऱ्यांदा वर्चस्व प्रस्थापित करत भाजपाचे प्रणव चव्हाण यांनी ‘हॅटट्रिक’ केली आहे.तालुक्यातील बोर्डा येथील ग्रामपंचायतीच्या सात जागानसाठी झालेल्या निवडणुकीत बाजार समितीचे संचालक तथा विद्यमान सरपंच प्रणव विजयेंद्र चव्हाण यांच्या ग्रामविकास आघाडीने प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचा पराभव करत सहा जागा जिंकल्या होत्या. यानंतर आरक्षण सोडतीमध्ये सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी सुटले होते. यानुसार सरपंच, उपसरपंच निवडीसाठी अध्यासी अधिकारी निवास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरपंचपदी आशाताई व्यंकट शेळके यांची तर उपसरपंचपदी प्रणव चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी ग्रामसेवक पी. बी. तोडकर, तलाठी प्रदीप पारखे, पोलिस पाटील गोवर्धन सुरवसे उपस्थित होते.

यावेळी नूतन पदाधिकारी यांच्यासह सदस्य नीता शेळके, शिवकन्या सुरवसे, सयाजी मासाळ, विजय जगताप, वर्षा शेळके यांचा ज्येष्ठ नेते विजेंद्रअण्णा चव्हाण, मधुकर शेळके, चंद्रकांत शेळके, सुभाष शेळके, कुंडलिक पारेकर, सुनील पारेकर, सूरेश शेळके, आबा शेळके, बाळासाहेब शिंदे, अरुण मासाळ यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

चौकट...

चव्हाण यांची हॅट्‌ट्रीक

ज्येष्ठ नेते विजयेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे संचालक तथा विद्यमान सरपंच प्रणव चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले आहे. यावेळी त्यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. हॅट्‌ट्रीक केल्याबद्दल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही त्यांचे कौतुक केले.

Web Title: Shelke, Chavan unopposed on Borda Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.