शिक्षणाच्या प्रसारासाठी शिंदे गुरुजींनी आयुष्य वेचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:37+5:302021-09-08T04:39:37+5:30
परंडा : शैक्षणिक प्रगती झाली तरच मराठवाडा सुधारेल, अशी रा. गे. शिंदे गुरुजींची धारणा होती. यामुळे ग्रामीण भागात ...
परंडा : शैक्षणिक प्रगती झाली तरच मराठवाडा सुधारेल, अशी रा. गे. शिंदे गुरुजींची धारणा होती. यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांनी केले.
येथील शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा महाविद्यालयात रा. गे. शिंदे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुनील शिंदे होते. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, आयक्यूएसीचे चेअरमन डॉ. महेशकुमार माने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. संजीवन गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्या डॉ. सावळे म्हणाल्या, शिंदे गुरुजी महान विचारवंत होते. त्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण होते. ते अभ्यासू होते. स्वतःच्या संस्थेबरोबरच मराठवाड्यामध्ये इतर अनेक शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. प्रास्ताविक प्रा. संभाजी धनवे यांनी केले, तर आभार डॉ. विद्याधर नलवडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. राहुल देशमुख, प्रा. दीपक तोडकरी, प्रा. डॉ. विद्याधर नलवडे, प्रा. डॉ. विशाल जाधव, कर्मचारी उत्तम माने, हनुमंत मार्तंडे, प्रमोद केजकर यांनी सहकार्य केले. यावेळी वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. सचिन चव्हाण यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्यामुळे त्यांचाही सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुनील शिंदे व प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांच्या हस्ते करण्यात आला.