शिवसेनेकडून परिचारिकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:50+5:302021-05-13T04:32:50+5:30
जगातील पहिल्या परिचारिका प्लोरेन्स नाईंगटेल यांचा जन्म १२ मे राेजी झाला हाेता. त्यांचा हा जन्मदिवस संपूर्ण जगभरात जागतिक परिचारिका ...
जगातील पहिल्या परिचारिका प्लोरेन्स नाईंगटेल यांचा जन्म १२ मे राेजी झाला हाेता. त्यांचा हा जन्मदिवस संपूर्ण जगभरात जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.
सध्याचे बदललेले वातावरण, उंचावलेले आयुष्यमान, वाढलेली लोकसंख्या, जुुनाट असाध्य रोगात झालेली वाढ, नवीन रोगांची लागण झालेला इबोला, चिकुन गुनिया, डेंग्यू, एचआयव्ही तसेच कोविड-१९ यासारख्या आजारांमुळे सर्व देशातच उच्चप्रतीच्या रुग्णसेवेची मागणी वाढत आहे. अशा आजारांच्या नियंत्रणामध्ये परिचारिकांची भूमिका महत्त्वाची आहे. हीच बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने बुधवारी परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार चाैगुले, किरण पाटील यांनी मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक बडे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, डॉ. प्रवीण जगताप, डॉ. विक्रम आलंगेकर, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, योगेश तपसाळे, शरद पवार, सचिन जाधव, प्रमुख परिचारिका जयश्री जाधव, स्वाती जाधव, सुनीता मार्कड, कल्पना गाढवे, सुभद्रा गाढवे, शोभा तुरोरे, अफसर तांबोळी आदी उपस्थित हाेते.