शिवनृसिंह ग्रुप, तेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:34 AM2021-02-20T05:34:14+5:302021-02-20T05:34:14+5:30
तेर - येथील नृसिंह वेस येथे शिवनृसिंह ग्रुपच्या वतीने शिवबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. अध्यक्ष मंगेश पांगरकर, उपाध्यक्ष अविनाश ...
तेर - येथील नृसिंह वेस येथे शिवनृसिंह ग्रुपच्या वतीने शिवबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. अध्यक्ष मंगेश पांगरकर, उपाध्यक्ष अविनाश इंगळे, अक्षय कोळपे, वैभव वैरागकर यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
महाराष्ट्र संत विद्यालय, तेर
तेर - महाराष्ट्र संत विद्यालयात मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी चौक, तेर
तेर -छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या शिवबांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात, तेर
तेर - ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नवनाथ नाईकवाडी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह कर्मचारी उपस्थित होते
मध्यवर्ती शिवजयंती मंडळ, काक्रंबा (फाेटाे आहे)
काक्रंबा -येथील मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्या वतीने ॲड. नागनाथ कानडे, अनील बंडगर, माजी पंचायत समिती सदस्य अच्युत वाघमारे, बालाजी बंडगर, वामन पांडागळे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ॲड. अंगद पवार, उमेश पाटील, शहाजी नन्नवरे, शरद कानडे, राम बचाटे, राम घोगरे, बालाजी मोरे, उमेश पांडगळे, विनोद साबळे, सुरेश भिसे, किशोर सोनवणे, समाधान देवगुंडे, शिवाजी सुरवसे, कालिदास साठे, बंटी घोगरे, उपसरपंच शुभांगी साबळे, पांडुरंग साठे, करीम अन्सारी, शाम ढेरे आदी उपस्थित होते.
येरमाळा येथे शिवजयंती उत्साहात (फाेटाे आहे)
येरमाळा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त येरमाळा येथील जनहित पतसंंस्था, मावळा ग्रुप,येडेश्वरी मिञ मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, पत्रकार संघ कार्यालय, ग्रामपंचायतीसह विविध शासकीय कार्यालयांमध्ये तसेच घरोघरी शिवजयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, येथील श्री समर्थ बैटक सभागृहामध्ये सरपंच तब्सुम रफिक सय्यद, ग्रा.प.सदस्या सुजाता श्रीकांत देशमुख, मंदाकिनी आबासाहेब बारकुल सत्यशिला मुकूंदराव देशमुख यांच्या हस्ते शिवबांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तसेच श्री शिवसमर्थ नगर फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी श्री येडेश्वरी देविचे मानकरी अमोल पाटील,रामराव पाटील,विजय देशमुख, डी.आर.बारकुल, संजय रुमणे, संतोष बारकुल, गणेश देशमुख, प्रसाद आगलावे, परमेश्वर आगलावे, सूर्यकांत बेदरे आदी उपस्थित हाेते.
रूपामाता मल्टीस्टेट कार्यालय (फाेटाेसह मस्ट)
उस्मानाबाद - येथील रूपामाता अर्बन-मल्टीस्टेटच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रुपामाता समुहाचे चेअरमन ॲड. व्यंकटराव गुंड, समता पंतसस्थेचे कार्यकारी संचालक संदिप कोयटे, समता इंटरनॅशनल स्कुलचे कार्यकारी संचालक स्वाती कोयटे, राजाभाऊ वैद्य, अजित व्यंकटराव गुंड यांची प्रमुख उपस्थिती हाेती. या प्रसंगी भगीरथ जोशी यांनी आपल्या भाषणातून शिवरायांचे कार्य मांडले. कार्यक्रमास सत्यनारायण बोधले, मिलींद खांडेकर, विधी अधिकारी विद्युलता दलभंजन, खोत सागर, सोमेश्वर शिंदे, तडवळकर, तिवारी, कासार, भोसले, शाहुराज गवाड, महेश जाधव, जाधव, गगणे, अश्विनी मदनुरकर, मृणमई पाटील, मधुरा कुलकर्णी, स्वामी, घुट्टे, मंडगे, आकोसकर, इंगळे,गायकवाड, भोरे, नामदेव सुर्यवंशी आदी उपस्थित हाेते.
के. टी. पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय (फाेटाे आहे..)
उस्मानाबाद -येथील के.टी. पाटील संगणकशास्त्र महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अजित मसलेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. कृष्णा तेरकर, प्रा. पी. के. कुलकर्णी, प्रा. एस. आर. एखंडे, प्रा. के.पी. वराळे, प्रा. एस. एस. पाटील, विनोद बनसोडे, अजय शिराळ, जाधव आदींची उपस्थिती हाेती.
काजळा ग्रामपंचायत (फाेटाे आहे.)
उस्मानाबाद - तालुक्यातील काजळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमचे पूजन सरपंच प्रवीण पाटील, ग्रामसेवक नितीन रणदिवे, मंडळाचे अध्यक्ष आकाश हाजगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
शिवजयंती माहाेत्सव कमिटी, वाशी (फाेटाे आहे)
वाशी -येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कमिटीच्या वतीने आयाेजित कार्यक्रमात शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन तहसिलदार नरसिंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवर व शिवप्रेमी नागरिकांनी अभिवादन केले. तसेच शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, माजी नगराध्यक्ष नितिन चेडे, भाजपाचे सुरेश कवडे, प्राचार्य डाॅ. रविंद्र कठारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ.कपिल पाटील,वैद्यकीय अधिकारी डाॅ.महावीर कोटेचा,डाॅ.अमर तानवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते मच्छिंद्र कवडे, दिग्वीजय चेडे, शिवहार स्वामी, सतिश शेरकर,राहुल कवडे,प्रशांत कवडे,संदीप हुंबे,विकास मोळवणे,डाॅ. विकास पाटील, समीर पाटील,डाॅ. श्रीकांत कवडे, दादासाहेब चेडे, सतिश जगताप, सुर्यकांत मोळवणे,संतोष पवार,कैलास गवारे,संतोष चेडे, सुरज नाईकवाडी, सुमित कवडे, सचिन गवारे, अमित गपाट, प्रेम मोळवणे, अमर शितोळे आदी उपस्थित हाेते.
राष्ट्रवादी काॅंग्रेस, परंडा (फाेटाे आहे)
परंडा - येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष ॲड. संदीप पाटील,ज्येष्ठ ॲड. सुभाष वेताळ, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, शहराध्यक्ष वाजीद दखनी, पं. स. सदस्य ॲड. अमोल करळे, ॲड. सुहास पाटील, श्रीहरी नाईकवाडी, नंदु शिंदे, प्रदीप कोकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी (फाेटाे आहे)
वाशी- येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत यांच्या हस्ते प्रतिमापूजर करण्यात आले. यावेळी एस. आर. थोरबोले, डी. के. घुमरे ,एस. व्ही. क्षीरसागर, एस. बी. छबिले, टी. सी. मुळे, एस. बी. मिसाळ ,एस. सी. जगताप आदी कर्मचारी उपस्थित होते.
अंगणवाडी, येणेगूर (फाेटाे आहे)
येणेगूर - येथील लक्ष्मी मंदीरानजिकच्या अंगणवाडीत बालकांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले .यावेळी अंगणवाडी शिक्षिका मदतनीस व पालक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा ऋषिकेश जोशी याने तर जिजाऊ यांची वेशभूषा अंजली मायनाळे या चिमुकलीने केली हाेती.
शिवजन्माेत्सव साेहळा समिती, तडवळे
कसबे तडवळे - उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयाेजित कायर्यक्रमात पुतळ्याचे पूजन उद्योजक राजाभाऊ लोंढे, माजी उपसरपंच तुळशीदास जमाले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विशाल जमाले, कलाम कोतवाल, प्रताप करंजकर, धनाजी पाटील, मिलिंद जोशी, किशोर डाळे, पवन करंजकर, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष महेश होगले, उपाध्यक्ष किशोर कदम, सागर उमाटे, प्रशांत कदम, राहुल नाईकनवरे आदी उपस्थित हाेते.