लसीकरण शिबिरात गोळ्यांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:33 AM2021-09-11T04:33:07+5:302021-09-11T04:33:07+5:30

तामलवाडी : कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतर लाभार्थींना देण्यात येणाऱ्या पॅरासिटेमॉल गोळ्यांचा तुटवडा भासल्याने १०० लाभार्थींना गोळ्या मिळाल्या नसल्याचा प्रकार ...

Shortage of pills in vaccination camps | लसीकरण शिबिरात गोळ्यांचा तुटवडा

लसीकरण शिबिरात गोळ्यांचा तुटवडा

googlenewsNext

तामलवाडी : कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतर लाभार्थींना देण्यात येणाऱ्या पॅरासिटेमॉल गोळ्यांचा तुटवडा भासल्याने १०० लाभार्थींना गोळ्या मिळाल्या नसल्याचा प्रकार तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु) येथील लसीकरण शिबिरात घडला.

गुरुवारी काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिंपळा (बु) येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य विभागाने कोरोनाचे ३०० डोस उपलब्ध करून दिले होते. मात्र, लस टोचून घेतल्यानंतर लसीचा त्रास जाणवू नये किंवा ताप येऊ नये, यासाठी लाभार्थींना पॅरासिटेमॉलच्या चार गोळ्या दिल्या जातात. गुरुवारी आरोग्य विभागाने फक्त लस घेतलेल्या २०० लाभार्थींनाच या गोळ्या दिल्या. गोळ्यांचा साठा संपल्याने उर्वरित १०० जणांना लस घेऊन गोळ्यांशिवाय परतावे लागले. त्यामुळे लसीच्या डोसच्या प्रमाणात गोळ्यांचा साठा उपलब्ध करावा, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

चौकट

आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण शिबिरात लसीच्या प्रमाणात गोळ्यांचा साठा ठेवायला पाहिजे. तसे न करता फक्त २५० लाभार्थींना गोळ्यांचा पुरवठा केला गेला, अन्य लाभार्थींना गोळ्या मिळाल्या नाहीत. पॅरासिटेमॉल गोळ्यांचा तुटवडा दूर करावा.

- बालाजी चुंगे, माजी सदस्य, ग्रा. पं.

चौकट

जिल्हास्तरावरून गोळ्यांचा पुरवठा कमी प्रमाणात झाला आहे. उपकेंद्रास उपलब्ध असलेल्या फंडातून गोळ्यांची खरेदी करावी, असे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार पुढील लसीकरणावेळी गोळ्यांचा योग्य साठा उपलब्ध करून घेऊ.

- जनार्दन गोप, आरोग्य सेवक

Web Title: Shortage of pills in vaccination camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.