लेटलतिफ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:35 AM2021-09-25T04:35:03+5:302021-09-25T04:35:03+5:30
शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या दिवशी सकाळी कार्यालयीन वेळेपूर्वीच काही कर्मचारी कार्यालयात दाखल झाले होते. शिवाय, स्वत: गटविकास ...
शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या दिवशी सकाळी कार्यालयीन वेळेपूर्वीच काही कर्मचारी कार्यालयात दाखल झाले होते. शिवाय, स्वत: गटविकास अधिकारी नामदेवराव राजगुरू हे देखील वेळेअगोदर दाखल झाले होते. मात्र, तीन-चार कर्मचारी पुन्हा उशिराने हजर झाले. यामुळे त्यांना लेट मस्टरवर सह्या करण्यास सांगून कारणे दाखल नोटीस बजावण्यात आली.
पाच दिवसांचा आठवडा असल्याने सकाळी पावणेदहा ते सव्वासहा या वेळेत कर्मचाऱ्यांनी कार्यालयात थांबणे गरजेचे आहे. परंतु, येथील पंचायत समितीसह अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचारी सकाळी उशिराने दाखल होतात. अशांवर ना अधिकाऱ्यांचा धाक आहे, ना राजकीय पुढाऱ्यांचा. त्यामुळे कामानिमित्त ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना तासन् तास ताटकळत थांबावे लागते. दरम्यान, यापुढील काळात उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गटविकास अधिकारी राजगुरू व तहसीलदार नरसिंग जाधव यांनी दिला आहे.