युवकांनी घातले पुलाचे श्राध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 06:52 PM2020-09-30T18:52:11+5:302020-09-30T18:52:55+5:30
तालुक्यातील वर्दळीचा रस्ता असलेल्या भूम- बार्शी मार्गावरील भांडगाव येथील रस्त्यावरील पुलाची उंची वाढविण्याबाबत वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील युवकांनी बुधवार दि.३० रोजी या पुलाचे श्राद्ध घालून पिंडदान केले.
परंडा : तालुक्यातील वर्दळीचा रस्ता असलेल्या भूम- बार्शी मार्गावरील भांडगाव येथील रस्त्यावरील पुलाची उंची वाढविण्याबाबत वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील युवकांनी बुधवार दि.३० रोजी या पुलाचे श्राद्ध घालून पिंडदान केले.
कमी उंची असल्याने या पुलावर पावसाळ्यात सतत पाणी येते आणि वाहतूक खोळंबते. पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात जाण्यासाठी बार्शी मार्गे भूम हा जवळचा रस्ता आहे. परंतु, खराब रस्ता व पुरस्थितीमुळे सातत्याने येथे वाहतुकीचा खोळंबा होतो. याकडे लक्ष वेधण्यासाठी भांडगाव येथील छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय होळे, समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार, छत्रपती प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर अंधारे यांच्यासह युवकांनी एकत्र येऊन भांडगावच्या या पुलावर श्राद्ध घालून पिंडदान केले.