यात्रा परिसरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:24 AM2021-04-29T04:24:10+5:302021-04-29T04:24:10+5:30

येरमाळा : कोरोना प्रादुर्भावामुळे येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द करून सर्व धार्मिक विधी मोजक्या पुजारी व ...

Shukshukat in the Yatra area | यात्रा परिसरात शुकशुकाट

यात्रा परिसरात शुकशुकाट

googlenewsNext

येरमाळा : कोरोना प्रादुर्भावामुळे येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द करून सर्व धार्मिक विधी मोजक्या पुजारी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी भाविकांच्या गर्दीने फुलून जाणारा मंदिर परिसर आणि जुना वेचण्याचे मैदानातही शुकशुकाट दिसून येत आहे. मंगळवारपासून या यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला, या निमित्त मंदिरात मोजक्याच पुजारी व मानकऱ्यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली.

दरवर्षी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी यात्रेतील मुख्य आकर्षण असलेला चुना वेचण्याचा कार्यक्रम लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रौत्सव रद्द करतानाच भाविकांनी गर्दी करू नये, या अनुषंगाने २७ व २८ मे रोजी संचार बंदीही लावण्यात आली आहे. त्यामुळे मंदिरासह चुना वेचण्याच्या आमराई परिसरातही शुकशुकाट दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी कालावधीमध्ये देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी हा परिसर फुलून जातो. जिकडे पाहावे तिकडे आराध्याचे जथ्येच्या जथ्ये देवीची गाणी गात हलगी व संबळाच्या तालावर ठेका धरताना दिसतात, परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने चैत्र पौर्णिमा (मंगळवार) ते चुना वेचण्याचा दिवस (बुधवार) अशा दोन दिवसांसाठी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाविकांविना मंदिर व मैदान ओस दिसत आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

मागील वर्षीही कोरोना प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द केली होती, परंतु चुना वेचण्याच्या दिवशी भाविकांनी हजेरी लाऊ नये, या अनुषंगाने तहसीलदारांनी मुख्य ठिकाणांची, तसेच मंदिरातील व्यवस्थेची पाहणी करून, सर्व दिशेला असलेले दरवाजे बंद असल्याची खातरजमा करून, पुढील यात्रा काळात या मार्गाचा लोकांनी मंदिरात प्रवेश करू नये, अशी व्यवस्था राखण्याचे आदेश पुजाऱ्यांना दिले होते. मात्र, या वर्षी तालुका, जिल्हा स्तरावरील एकही अधिकाऱ्याने मंदिराला भेट दिली नाही.

येरमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने यात्रेतील मुख्य चुन्याच्या रानात, मंदिर परिसर, मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर, आमराई परिसरात चोख बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले. पंचक्रोशीतील व गावातील ग्रामस्थांनीही संचारबंदीचे आदेशाचे काटेकोर पालन केले.

Web Title: Shukshukat in the Yatra area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.