सातनंतर शटर डाऊन, रस्त्यावर मात्र गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:35 AM2021-03-23T04:35:09+5:302021-03-23T04:35:09+5:30
सायंकाळी सात वाजल्यानंतर दुकाने बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. सोमवारी सात वाजेपर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली ...
सायंकाळी सात वाजल्यानंतर दुकाने बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. सोमवारी सात वाजेपर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. सात वाजल्यानंतर शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नेहरू चौक परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद करण्याासाठी लगबग सुरू होती. नेहरू चौक परिसरातील ७.१० वाजता काही कापड दुकानांचे शटर अर्धे बंद करण्यात आलेले होते तर काही दुकानदारांनी दुकाने बंद करून घराकडे मार्गस्थ होत होती. ७.१५ वाजता अक्सा चौक परिसरातील दुकानांची पाहणी केली असता. दुकाने बंद असल्याचे आढळून आले. मात्र, बाजारपेठेतील रस्त्यावर नागरिकांची रेचलेच सुरुच होती.
सातनंतर भाजी विक्रेते ठाण मांडून
सावरकर चौक, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, भोसले हायस्कूल परिसरातील मेडिकल दुकानेवगळता सर्वच दुकाने ७.१८ मिनिटाला बंद होती. बंद दुकानासमोर तरुणांचे टोळके बसलेले होते. ७.२० वाजता राजमाता जिजाऊ चौक परिसरातील हॉटेल, स्टेशनरी दुकाने बंद होती. फळ विक्रेत्यांनी हातगाडे ठिकाणाला लावून घराकडे परतण्याच्या तयारीत होते. या परिसरातील सात वाजल्यानंतर दुकाने, हॉटेल पूर्णपणे बंद झाली असली तरी, रस्त्यावर वाहनधारकांची वर्दळ होती शिवाय, रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. जिजाऊ चौक ते माणिक चौकादरम्यानच्या रस्त्यावर भाजी विक्रेते मात्र ठाण मांडून होते शिवाय, ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होती.