पुजार्याची प्रामाणिकता, अडीच तोळे सोने केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:24 AM2020-12-27T04:24:05+5:302020-12-27T04:24:05+5:30
कोणत्याही मोठ्या देवस्थानांतील पुजार्यांवर सातत्याने टीकेचा मारा होत असतो. मात्र, यातही चांगले, प्रामाणिकपणे सेवा बजावणार्या पुजार्यांची संख्या मोठी आहे. ...
कोणत्याही मोठ्या देवस्थानांतील पुजार्यांवर सातत्याने टीकेचा मारा होत असतो. मात्र, यातही चांगले, प्रामाणिकपणे सेवा बजावणार्या पुजार्यांची संख्या मोठी आहे. याचाच प्रत्यय तुळजापुरातील तुळजाभवानी देवीचे पुजारी सोमनाथ अमृतराव यांनी आणून दिला. बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील काही देवीभक्त तुळजापूर येथे पुजारी सोमनाथ अमृतराव यांच्याकडे देवीचे विधी करण्यासाठी आले होते. देवीचे विधी पूर्ण झाल्यानंतर देवीस नैवेद्य दाखविण्यासाठी त्यांनी पुजारी अमृतराव यांना धान्याचा शिधा दिला. सदरील शिधा घेऊन पुजारी अमृतराव घरी आले व त्यांनी घरातील कुटुंबीयांना तो शिधा दिला. त्याचा नैवेद्य तयार करण्यास सांगितले. यावेळी डाळीच्या शिधेत संबंधित भाविकांचे नजर चुकीने २५ ग्रॅम सोने असल्याचे आढळून आले. दरम्यान, संबंधित भाविक हे शहरात प्रसाद खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळी पुजारी अमृतराव यांनी त्यांना सोन्याच्या दागिन्याबद्दल माहिती दिली व ते त्यांना लागलीच परत आणून दिले. पुजारी अमृतराव यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल भाविक महादेव मुंडे यांनी त्यांचा सत्कार केला.