सोळा हजारांवर कोरोना योद्धयांना अद्यापही दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:30 AM2021-05-15T04:30:55+5:302021-05-15T04:30:55+5:30

जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यापासून कोरोनाने शिरकाव केला आहे. तेरा महिन्यापासून आरोग्य कर्मचारी, पोलीस, महसूल कर्मचारी, पालिका कर्मचारी दिवसरात्र काम ...

Sixteen thousand Corona Warriors still awaiting a second dose | सोळा हजारांवर कोरोना योद्धयांना अद्यापही दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

सोळा हजारांवर कोरोना योद्धयांना अद्यापही दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

googlenewsNext

जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यापासून कोरोनाने शिरकाव केला आहे. तेरा महिन्यापासून आरोग्य कर्मचारी, पोलीस, महसूल कर्मचारी, पालिका कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. पहिल्या लाटेत आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यातील काही जणांना जीवही गमावा लागला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने १६ पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, लॅब टेक्निशियन यांना लस दिली जात होती. त्यानंतर पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, पालिका कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाऊ लागले. हेल्थ केअर वॅर्कर १० हजार ३५१ इतकी संख्या असून, त्यातील ६ हजार १७९ जणांना दुसरा डोस मिळाला आहे. तर २० हजार ७९९ फ्रंट लाईन वर्कर पैकी १४ हजार ६४६ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला. अशा एकूण ३१ हजार १५० कोरोना योद्धयांपैकी १४ हजार ६४६ योद्धयांना दुसरा डोस मिळाला आहे. तर अद्यापही १६ हजार ५०४ कोरोना योद्धे दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.

एकही डोस न घेणारे ४,६५५

आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्करांचा कोरोना रुग्णांशी थेट संपर्क येत असतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरण करण महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाने आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्सला पहिल्या टप्प्यात लस देण्यास सुरुवात केली. लसीकरण मोहीम सुरु होऊन चार महिन्याचा कालावधी लोटला आहे तरी अद्यापही ४ हजार ६५५ व्यक्तींनी लस घेतलेली नाही.

किती लसीकरण

आरोग्य कर्मचारी पहिला डोस ९,२०९ दुसरा डोस ६,१६९

फ्रंट लाईन वर्कर पहिला डोस १७,२८६ दुसरा डोस १४,६४६

Web Title: Sixteen thousand Corona Warriors still awaiting a second dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.