थरारक! बस सुरू होताच अचानक पेटली; जळत्या बसमधून प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:14 IST2025-02-14T11:10:09+5:302025-02-14T11:14:28+5:30

थरारक! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसच्या केबिनने अचानक घेतला पेट; चालकाने ७० प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने अनर्थ टळला

Smoke from the cabin as soon as the bus started; 70 passengers were saved by the driver's alertness | थरारक! बस सुरू होताच अचानक पेटली; जळत्या बसमधून प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी धडपड

थरारक! बस सुरू होताच अचानक पेटली; जळत्या बसमधून प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी धडपड

- बालाजी बिराजदार
लोहारा ( धाराशिव) :
बसवकल्याण - तुळजापूर एसटी बसने अचानक पेट घेतला. याप्रसंगी चालकाच्या सर्तकतेमुळे बसमधील ७० प्रवाशी बाल बाल बचावले. ही घटना लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेटवर शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता घडली आहे.

तुळजापूर आगाराची एसटी बस रोज दुपारी साडेतीन वाजता तुळजापुरहून लोहारामार्गे  बसवकल्याणला मुक्कामी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता बसवकल्याणहून ही बस परत लोहारा मार्गे तुळजापूरला जाते. शुक्रवारी सकाळी सहा वाजता ही एसटी बस बसवकल्याणहून निघाली सकाळी पावणे नऊच्या सुमारास लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेट समोर प्रवासी उतरण्यासाठी व चढण्यासाठी थांबली. याप्रसंगी प्रवासी गाडीत बसल्यानंतर बस चालक एम. व्ही. घंटे यांनी बस सुरू करताच बसच्या केबिनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच. चालक घंटे यांनी प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. त्यातच बसच्या केबिनमध्ये जाळ लागला. चालक घंटे यांच्या सर्तकतेमुळे बसमधील ७० प्रवाशी बालबाल बचावले.

धुराचे लोट अन् प्रवाशांचा आरडाओरडा 
बस सुरू करताच केबिनमधून सुरुवातीला धूर निघाला, त्यामुळे चालकाने लागलीच सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. प्रवाशी उतरण्यास सुरुवात होताच केबिनमध्ये आग लागून धुराचे लोट बाहेर पडू लागले. यामुळे प्रवाशी घाबरून आरडाओरडा करत होते. जीव मुठीत घेऊन सर्व प्रवाशी धुरातून रस्ता काढत कसेबसे बसच्या बाहेर पडले. काही प्रवाशांनी तर खिडकीमधून उडी घेत सुटका करून घेतली. सर्व प्रवाशी सुखरूप असले तरी प्रचंड घाबरलेले आहेत. 

साखर कारखान्याचे अग्निशामक दल धावले
याप्रसंगी तात्काळ लोकमंगल साखर कारखान्याचे अग्निशामक गाडी आल्याने आग आटोक्यात आली. या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसच्या साह्याने तुळजापुरला सोडण्यात आले. या घटनेची माहिती वाहक बी.ए.गोरे यांनी लोहारा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक तुकाराम घोडके यांना दिली. असता वाहतूक नियंत्रक घोडके यांनी लोहारा पोलीस ठाण्यात माहिती दिली.

Web Title: Smoke from the cabin as soon as the bus started; 70 passengers were saved by the driver's alertness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.