ग्रामीण युवतींसाठी सौर प्रशिक्षण वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:35 AM2021-08-27T04:35:06+5:302021-08-27T04:35:06+5:30

यात सौरपट्टिका (पॅनल) जोडणी शिकविण्यात येत आहे. जपानी सौरतज्ज्ञ ताजिमा तोशिओ यांनी यापूर्वी हराळी विद्यालयाला भेट दिली असून, ...

Solar training classes for rural girls | ग्रामीण युवतींसाठी सौर प्रशिक्षण वर्ग

ग्रामीण युवतींसाठी सौर प्रशिक्षण वर्ग

googlenewsNext

यात सौरपट्टिका (पॅनल) जोडणी शिकविण्यात येत आहे. जपानी सौरतज्ज्ञ ताजिमा तोशिओ यांनी यापूर्वी हराळी विद्यालयाला भेट दिली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधिनीने बनविलेल्या सौरलॅमिनेटरच्या आधारे सौरपट्टिका बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. किसन सूर्यवंशी व आकाश वलदोडे हे दोघेजण तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील सौर प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या युवतींनी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी पदविका विद्यालयाच्या प्राचार्या गौरीताई कापरे यांनी केले आहे. या प्रशिक्षणात प्रावीण्य मिळविणाऱ्या निवडक प्रशिक्षणार्थींना कमवा व शिका, या योजनेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील टप्प्यात या प्रशिक्षणात सौरदिव्यांची जुळणीही करण्यात येणार आहे.

Web Title: Solar training classes for rural girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.