गोंधळवाडी येथे घनवृक्ष लागवड सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:33+5:302021-06-10T04:22:33+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मोकळ्या जागेत ग्रामपंचायत व शिक्षकाच्या वतीने घनवृक्ष लागवडीचा प्रारंभ मुख्य ...
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मोकळ्या जागेत ग्रामपंचायत व शिक्षकाच्या वतीने घनवृक्ष लागवडीचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फड यांनी प्राथमिक शाळेला भेट देऊन शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमाची पाहणी केली.
गोंधळवाडी ग्रामपंचायतीने शाळेच्या इमारतीमागील जागेत घनवृक्ष लागवड केली असून, शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याचे चांगले संगोपनही केले आहे. त्याची पाहणी करून नव्याने १०० घन वृक्षांची लागवड मुख्याधिकारी फड यांच्या हस्ते करण्यात आली. मुख्यधिकारी फड यांनी रंगरंगोटी केलेल्या इमारतीची तसेच प्रयोगशाळा, ग्रंथालय, डिजिटल वर्गखोल्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी सरपंच राजाभाऊ फंड, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, गट शिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, उपसरपंच गोपाळ मोटे, केंद्र प्रमुख रमाकांत वाघचौरे, ग्रामसेविका शोभा देवकते, विस्तार अधिकारी भांगे, वाय. के. चव्हाण, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. बी. तांबोळी, भगवान बाशेवाड, दत्तात्रय माळी, लालासाहेब मगर, जयमाला वटणे, व्यंकट तोटावार, मंजूषा भुसे, ज्योती कुलकर्णी, शंकर राऊत, भैया पारसे, गुलचंद माने, राजकुमार यमगर, अजित मोटे, धर्मराज मोटे, शाम सातपुते, महेश माने, वैभव मोटे, संग्राम पाटील, श्रावण सातपुते, आदी उपस्थित होते.
चौकट
ठेकेदारावर कारवाईचे आदेश
गोंधळवाडी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीच्या छताखालील भाग काही महिन्यांपूर्वी कोसळला होता. या अंगणवाडीला मुख्याधिकारी विजयकुमार फड यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ठेकेदाराने अद्याप त्याची दुरुस्ती केली नसल्याने तसेच निकृष्ट बांधकामाचा ठपका ठेवत ठेकेदारावर कारवाईचे आदेश त्यांनी दिले.
शाळेसाठी दोन लाखांवर खर्च
जिल्हा परिषद शाळेत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून सव्वा लाखाचा निधी दिली असून, शिक्षक व गावकऱ्यांनी ९० हजारांचा लोकवाटा जमा केला आहे. यातून आदर्श इमारत, सोयी उपलब्ध केल्या आहेत. रंगरंगोटी, प्रयोगशाळा, विज्ञान केंद्र तयार करण्यात आले. तसेच घनवृक्ष् लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून सांगवी (काटी) येथे उभारलेल्या रोपवाटिकेतून रोपांचा पुरवठा करण्यात आला.