जावई सरकारी नाेकरीवाला हवा, मग पेन्शनला विराेध का? संपकरी कर्मचाऱ्यांचा सवाल
By बाबुराव चव्हाण | Published: March 17, 2023 03:57 PM2023-03-17T15:57:41+5:302023-03-17T16:06:42+5:30
टाळ-मृदंगाचा गजर करीत संपकऱ्यांनी वेधले मागणीकडे लक्ष
धाराशिव : जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी १४ मार्चपासून सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. समाधानकारक निर्णय न झाल्याने शुक्रवारी चाैथ्या दिवशीही हे आंदाेलन सुरूच आहे. साेशल मीडियावर आंदाेलन ट्राेल हाेवू लागल्याने कर्मचार्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रत्येकजण जावई शाेधताना ताे सरकारी नाेकरीवाला आहे का, हे पाहिले जाते. मग आमच्या आंदाेलनाला विराेध का, असा सवाल उपस्थित केला. यावेळी संपकर्यांनी टाळ-मृदंगाचा गजर करीत पेन्शनच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले.
जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, यासाठी सरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील रूग्णालयांत रूग्णांचे हाल हाेताहेत. तर शास्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची नामुष्की मेडिकल काॅलेजवर ओढावली आहे. केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया सध्या करण्यात येत आहेत. साेबातच महसूल तसेच जिल्हा परिषदेतील मार्चएन्डची कामेही खाेळंबली आहेत. तर दुसरीकडे संप लांबत चालला आहे. जाेपर्यंत सरकार मागणीचा विचार करणार नाही, ताेवर माघार घेतली जाणार नाही, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे. दरम्यान, संपाच्या चाैथ्या दिवशी कर्मचार्यांनी टाळ-मृदंगाचा गजर करीत पेन्शनच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ‘पेन्शन द्या, पेन्शन द्या’, अशा स्वरूपाचा काही घाेषणाही देण्यात आल्या. यानंतर कर्मचार्यांनी सरकारने पेन्शनच्या मुद्याच्या अनुषंगाने काढलेल्या परिपत्रकाचेही दहन करण्यात आले.
आता राजपत्रित अधिकारी महासंघाचाही पाठींबा...
पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. आता त्यांना महाराष्ट्र राज्य रात्रपत्रित अधिकारी महासंघाचीही साथ लाभली आहे. आंदाेलनकर्त्या कर्मचार्यांचे मनाेधैर्य वाढवण्यासाठी सर्व अधिकार्यांनी जेवनाच्या वेळेत एकित्रित निदर्शने करावीत. या काळात ताेडगा निघाला नाही तर २८ मार्चपासून बेमुदत संप आंदाेलनात सक्रीय सहभागी व्हावे, असे महासंघाचे अध्यक्ष विनाेद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे व काेषाध्यक्ष नितीन काळे यांनी काढले आहे.