एक ट्रान्सफार्मर दुरूस्त होताच दुसरा जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:34 AM2021-04-23T04:34:58+5:302021-04-23T04:34:58+5:30

वाशी : येथील उपकेंद्रातील बिघाड झालेला एक ट्रान्सफार्मर दुरूस्त होतो ना होतो तोच दुसरा ट्रान्सफार्मर जळाल्याचा प्रकार बुधवारी घडला. ...

As soon as one transformer was repaired, the other caught fire | एक ट्रान्सफार्मर दुरूस्त होताच दुसरा जळाला

एक ट्रान्सफार्मर दुरूस्त होताच दुसरा जळाला

googlenewsNext

वाशी : येथील उपकेंद्रातील बिघाड झालेला एक ट्रान्सफार्मर दुरूस्त होतो ना होतो तोच दुसरा ट्रान्सफार्मर जळाल्याचा प्रकार बुधवारी घडला. यामुळे सध्या एकाच ट्रान्सफार्मरवरून आळीपाळीने वीजपुरवठा करण्याची वेळ महावितरण कार्यालयावर आली आहे.

वाशी येथील ३३ / ११ केव्ही उपकेंद्रांतर्गत वीज वाहिन्यांमध्ये अडथळा ठरणारी झाडे तोडण्याची मोहीम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी राबविली. यानंतर वीजपुरवठा ही चालू झाला. परंतु, अचानक वीज उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेच्या एका ट्रान्सफार्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तो बंद पडला. यामुळे या उपकेंद्रातील वीजपुरवठा तब्बल तीस तास खंडित राहिला. दरम्यान, मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास लिंगी पिंपळगाव येथील उपकेंद्रातून विद्युतपुरवठा घेऊन वाशी शहराची वीज सुरू झाली. परंतु , शेतीपंपासह पारा उपकेंद्राचा विद्युतपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंदच होता़ उपविभागीय अभियंता रमेश शेंद्रे यांच्यासह अभियंत्या रेणुका पत्की, यादव यांनी वरिष्ठांना याची माहिती दिल्यानंतर उस्मानाबाद येथून कार्यकारी अभियंता वाघमारे व चाचणी विभागाचे तांत्रिक सहाय्यक अभियंता पारेख हे सहकाऱ्यांसह येथे दाखल झाले. त्यांनी बुधवारी दिवसभर पाहणी व तांत्रिक दुरूस्ती करीत हा ट्रान्सफार्मर सुरू केला. परंतु, तोपर्यंत उपकेंद्रातील दुसरा ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाला. त्यामुळे आता हा ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी पाठविला जाणार असून, सध्या चालू असलेल्या एकाच ट्रान्सफार्मर वरून प्रत्येक फिडरसाठी सहा तास याप्रमाणे शहरासह शेती पंपाला देखील वीजपुरवठा केला जाणार असल्याचे अभियंता रमेश शेंद्रे यांनी सांगितले.

कोट..

वाशी येथील ३३ / ११ उपकेंद्रातील बऱ्याच वर्षांपूर्वीचा मुदतबाह्य झालेला ५ एमव्हीएचा ट्रान्सफार्मर जळाला आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या दुसऱ्या ५ एमव्हीएच्या ट्रान्सफार्मरवरून या केंद्रातील विद्युत ग्राहकांना आळीपाळीने विजेचे तास कमी करून विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे. नादुरुस्त ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीसाठी किमान पंधरा दिवस तरी लागतील.

- रमेश शेंद्रे, उपविभागीय अभियंता, वाशी

Web Title: As soon as one transformer was repaired, the other caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.