शेतशिवारात घुमतोय फटाके, डब्ब्यांचे आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:01 AM2021-03-04T05:01:38+5:302021-03-04T05:01:38+5:30
(फोटो : संतोष वीर ०३) भूम : शहरातील शेती शिवारात सकाळच्या वेळी शेतकरी ज्वारी पिकावरील पाखरे हकण्यासाठी फटाके, पत्र्याचा ...
(फोटो : संतोष वीर ०३)
भूम : शहरातील शेती शिवारात सकाळच्या वेळी शेतकरी ज्वारी पिकावरील पाखरे हकण्यासाठी फटाके, पत्र्याचा डब्बा वाजवत हुर्र हुर्र असा आवाज देत आहे. काही ठिकाणी बुजगावणेही उभे करून पाखरांपासून पिकाचे संरक्षण केले जात असल्याचे चित्र आहे.
शहारासह तालुक्यात ज्वारीचे पीक जोमात आहे. सध्या कणीस हुरड्यामधून ज्वारीत रूपांतरित होऊ लागले आहे. परंतु, भूख भागवण्यासाठी पाखरांचे थवे या पिकावर ताव मारत आहे. यामुळे शेतकरी सकाळी व सायंकाळी शेतात आपल्या पिकावरील पाखरे हकण्यासाठी विविध उपाययोजना करीत असल्याचे दिसून येत आहे. शिवारातील पाखरे दुसरीकडे जाईपर्यंत शेतकरी पत्र्याचा डब्बा, फटाके व विविध आवाज काढून पाखरे हाकत आहे. यामुळे शेतीशिवारात सध्या फटाक्यांच्या अवाजसह पत्र्यांच्या डब्यांचाही आवाज घुमत आहे.