नूतन जिल्हा कृषी अधिकारी तीर्थकर यांनी स्वीकारली सूत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:31+5:302021-08-21T04:37:31+5:30
उस्मानाबाद - जिल्हा परिषद कृषी अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे यांची नांदेड येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी लातूर जिल्ह्यातील उदगीर ...
उस्मानाबाद - जिल्हा परिषद कृषी अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे यांची नांदेड येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील उपविभागीय कृषी अधिकारी महेशकुमार तीर्थकर यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. त्यांनी शनिवारी आपल्या पदाची सूत्रे डाॅ. चिमनशेट्टे यांच्याकडून स्वीकारली.
जिल्हा कृषी अधिकारी डाॅ. चिमनशेट्टे यांनी यापूर्वी माेहीम अधिकारी म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला हाेता. यानंतर येथून त्यांची बदली झाली हाेती. दरम्यानच्या काळात जिल्हा कृषी अधिकारी म्हणून पदाेन्नती झाल्यानंतर ते त्यांना उस्मानाबाद येथे नियुक्ती मिळाली. त्यांनी आपल्या तीन ते चार वर्षांच्या कार्यकाळ खत, बियाणाच्या बाेगसगिरीला आळा घालण्यासाठी ठाेस पाऊले उचलली हाेती. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक कारवायाही झाल्या. साेबतच घरगुती बियाणाचा वापर वाढविण्यासाठीही त्यांनी शेतकऱ्यात जाऊन जनजागृतीवर भर दिला हाेता. परिणामी यंदाच्या खरीप हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी खासकरून घरगुती बियाणे उपयाेगात आणले. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राज्य शासनाने नांदेड येथे जिल्हा कृषी अधिकारी म्हणून बदली केली. त्यांच्या जागी उदगीर येथील उपविभागीय कृषी अधिकारी महेशकुमार तीर्थकर यांची नियुक्ती केली हाेती. त्यांनी आज डाॅ. चिमनशेट्टे यांच्याकडून पदभार स्वीकारला. तीर्थकर मूळचे उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली येथील रहिवासी आहेत. ते स्थानिकचे असल्यामुळे शेतकऱ्यांना माेठ्या अपेक्षा आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर तीर्थकर यांच्यासह चिमनशेट्टे यांचाही कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.