उमरग्यात सोयाबीन क्षेत्र सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:46+5:302021-06-02T04:24:46+5:30

उमरगा : तालुक्यात शेतकऱ्यांसोबतच प्रशासनानेदेखील खरीप हंगामासाठी जोरदार तयारी केली आहे. सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून, ...

Soybean area has the highest age | उमरग्यात सोयाबीन क्षेत्र सर्वाधिक

उमरग्यात सोयाबीन क्षेत्र सर्वाधिक

googlenewsNext

उमरगा : तालुक्यात शेतकऱ्यांसोबतच प्रशासनानेदेखील खरीप हंगामासाठी जोरदार तयारी केली आहे. सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून, चांगल्या पावसानंतर पेरणीला लगेचच सुरुवात होणार आहे.

यावर्षी तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे क्षेत्र जवळपास ४० हजार हेक्टर राहणार असून, त्याखालोखाल तूर १५ हजार, उडीद १२ हजार, तर मुगाचे क्षेत्र साडेचार हजार हेक्टर राहील, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आहे. सोयाबीन हे कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारे हे पीक आहे. त्यामुळे खरीप हंगामातील हे प्रमुख पीक बनले आहे. मात्र, या पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन वाणाचा वापर करणे गरजेचे आहे. नत्र खतांचा अतिवापर टाळून शेतकऱ्यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर द्यावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना एक एकर लागवडीकरिता दीड किलो रायझोबियम जिवाणू संवर्धक, दीड किलो पीएसबी आणि अर्धा किलो ट्रायकोडर्मा याप्रमाणे २५ किलो शेणखतात लागवडीपूर्वी साधारणतः आठ ते दहा दिवस आधी मिसळावे. त्यावर हलके पाणी शिंपडून शेणखत मिश्रित जैविक खत ओलसर करून

घ्यावे. शेणखत मिश्रित जैविक खताचा ढीग ओल्या गोणपाटाने झाकून घ्यावा. ढिगातील ओलसरपणा टिकवून ठेवण्यासाठी त्यादृष्टीने त्यावर पाणी शिंपडत रहावे. अशाप्रकारे तयार झालेले शेणखत मिश्रित जैविक खत सरत्याने, तिफणीने, काकरीने अथवा ट्रॅक्टरने पेरणी करताना बियाणे सोबतच द्यावे. अथवा काकरीमध्ये जैविक खत मिश्रित शेणखत टाकून कोळपणी करावी, असा सल्लादेखील देण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या शेतकरी जुन्या बियाणांची मागणी करीत असले तरी उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन वाणाची निवड करणे गरजेचे बनले आहे. सोयाबीनचे नवीन वाण एमएयूएस ७१, एमएयूएस १५८, एमएयूएस १६२, एमएयूएस ६१२, केडीएस ७२६ किंवा केडीएस ७५३ या अधिक उपत्पादन देणाऱ्या वानांची पेरणी करावी. या वाणाच्या झाडाची उंची व उत्पादनही जास्त असते तसेच. झाडे उंच असल्याने हार्वेस्टिंगद्वारे पीक काढता येते. जेणेकरून मजुरांची चिंता भेडसावत नाही, असेही कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

कोट.......

खते व बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी दुकानावर गर्दी करू नये, शक्यतो शेतकरी गटामार्फत खरेदी करावे. तसेच जास्त उत्पादकता देणाऱ्या नवीन वाणाची लागवड करावी. किमान ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतर उगवण शक्ती तपासून बुरशीनाशक व जैविक बीजप्रक्रिया करून रुंद वरंबा व सरी टोकन यंत्राच्या साहाय्याने पेरणी करावी.

- एस. एन. जाधव, तालुका कृषी अधिकारी

खताचा वापर योग्य करावा

माती परीक्षण अहवालानुसारच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची योग्य मात्रा द्यावी. सोयाबीन पिकाच्या मुळांवर रायझोबियम हा उपयुक्त जिवाणू राहत असल्याने या पिकास लागवडीनंतर नत्र खताची फारशी गरज भासत नाही. नत्र खताची मात्रा अधिक झाल्यास पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे नत्राचा अतिवापर हा पिकासाठी धोक्याचा ठरण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी हा धोका लक्षात ठेवून नत्रयुक्त खताचा आवश्यकतेनुसार वापर करणे गरजेचे असल्याचेही कृषी विभागाने म्हटले आहे.

Web Title: Soybean area has the highest age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.