तुळजाभवानी मंदिरात रंगांची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:28 AM2021-04-03T04:28:57+5:302021-04-03T04:28:57+5:30
शुक्रवारी पहाटे चरणतीर्थ विधी संपन्न झाल्यानंतर देवीचा नित्योपचार अभिषेक घाट होऊन पंचामृत अभिषेक संपन्न झाले. अभिषेक पूजेनंतर भोपे पुजारी ...
शुक्रवारी पहाटे चरणतीर्थ विधी संपन्न झाल्यानंतर देवीचा नित्योपचार अभिषेक घाट होऊन पंचामृत अभिषेक संपन्न झाले. अभिषेक पूजेनंतर भोपे पुजारी बांधवांनी श्री तुळजाभवानीची नित्यालंकार महापूजा मांडली. यानंतर भोपे पुजारी अतुल मलबा व विकास मलबा यांनी तुळजाभवानी देवीस रंगपंचमीनिमित्त पूर्णावळ व साखर-भाताचा नैवेद्य अर्पण केला व सोबतच आरती व अंगारा हे विधी पार पाडले. नित्योपचार पूजा होताच उपस्थित महंत व पुजारी यांनी श्री तुळजाभवानीस विविध रंग लावून आई राजा उदे उदेच्या घोषात पारंपरिक पद्धतीने तुळजाभवानीची रंगपंचमी साजरी केली. यावेळी महंत हमरोजी, महंत वाकोजी, भोपे पुजारी संजय सोनजी, संकेत पाटील, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, पुजारी सुधीर रोचकरी, दोन्ही पुजारी वर्ग, सेवेकरी, गोंधळी व मंदिर कर्मचारी उपस्थित होते.