पावसाने उडदाला फुटले कोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:10 AM2021-09-02T05:10:01+5:302021-09-02T05:10:01+5:30
पाथरुड परिसरात सध्या उडदाचे पीक काढणीला आले आहे. काही शेतकऱ्यांनी काढणी करून ढीग लावून ठेवले असून, काहींचा उडीद शेतातच ...
पाथरुड परिसरात सध्या उडदाचे पीक काढणीला आले आहे. काही शेतकऱ्यांनी काढणी करून ढीग लावून ठेवले असून, काहींचा उडीद शेतातच आहे. असे असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून असलेल्या सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे उडदाला कोंब फुटू लागले आहेत. अगोदरच ऐन पीक वाढीच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्याने पिकाचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट येत आहे. आता थोडेफार उत्पन्न पदरात पडेल, अशी आशा होती. मात्र, पिकाची काढणी सुरू असतानाच पाऊस सुरु असल्याने पीक भिजून पिकाला कोंब फुटल्याने काही प्रमाणात आलेल्या उडीद पिकाचेही पावसाने नुकसान होत आहे.
चौकट........
भरपाईची मागणी
अगोदर पावसाने तब्बल २२ दिवसांचा खंड दिल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर उडदाचे पीक काढणीला येताच पावसाने हजेरी लावली. यामुळे आता उडीद पिकाचेही नुकसान होताना दिसत आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.