एसटीचा प्रवास सुरक्षित, मग ट्रॅव्हल्सलाच पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:19 AM2021-07-24T04:19:43+5:302021-07-24T04:19:43+5:30

उस्मानाबाद : एस. टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास असा सर्वसाधारण समज आहे. असे असताना प्रवाशांकडून ट्रॅव्हल्सलाच अधिक पसंती दिली जात ...

ST travel is safe, so why travel? | एसटीचा प्रवास सुरक्षित, मग ट्रॅव्हल्सलाच पसंती का?

एसटीचा प्रवास सुरक्षित, मग ट्रॅव्हल्सलाच पसंती का?

googlenewsNext

उस्मानाबाद : एस. टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास असा सर्वसाधारण समज आहे. असे असताना प्रवाशांकडून ट्रॅव्हल्सलाच अधिक पसंती दिली जात आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बहुतांश नागरिकांकडूनच एस.टी. बसऐवजी ट्रॅव्हल्सचीच निवड करण्यात येत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून आलेल्या कोरोना संकाटामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस.टी.चे उत्पन्न जवळजवळ ठप्प झाले होते. मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने ७ जूनपासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. एसटी वाहतूक देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक एस.टी. बसच्या तुलनेत ट्रॅव्हल्सलाच जास्त पसंती देत आहेत. एस.टी.पेक्षा टॅव्हल्सचा प्रवास आरामदायक असल्याचा समज निर्माण होत आहे.

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल्स सुसाट

अपघात टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसला स्पीड लॉक करण्यात आला आहे. यामुळे इतर खासगी वाहनांच्या तुलनेत एसटी बसचे अपघात नसल्यासारखे आहेत. एसटीचा प्रवास खरोखरच सुरक्षित प्रवास आहे.

खासगी वाहनांच्या अपघातांत वाढ

बहुतांश अपघात खराब रस्त्यामुळे होत असले तरी याला वाहनधारकही तेवढेच जबाबदार आहेत. कारण रस्ता चांगला असल्यास वाहने सुसाट वेगाने पळविल्या जातात. यामुळे वाहनांवर नियंत्रण मिळविणे कठीण होत असल्याने अनेकवेळा अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यातून अनेकांना जीव गमवाला लागतो. मृताच्या कुटुंबीयाला कुठलीही नुकसानभरपाई दिली जात नाही.

अनेक एस.टी. बसेसची अवस्था अत्यंत बिकट झाली असली तरी एसटीतून प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे. प्रवास आरामदायक व्हावा याकरिता ट्रॅव्हल्समधून प्रवासाला पसंती देतात. मात्र, आरामापेक्षा सुरक्षित प्रवास महत्त्वाचा आहे. यामुळे एसटीतून प्रवासाला अधिक पसंती देतो. दररोज एसटीने अपडाऊन करतो.

श्रीकांत धावारे, प्रवासी.

एसटीचे चालक प्रशिक्षित असतात. याउलट ट्रॅव्हल्सचे चालक हे सातत्याने बदलत असून, त्यांना कुठलेही प्रशिक्षण नसते. त्यामुळे ट्रॅव्हल्समधून प्रवास करणे टाळत असतो. एसटीचा प्रवास सुरक्षित आहे. अपवादात्मक परिस्थितीतच ट्रॅव्हल्समधून प्रवास करतो. आरामापेक्षा जीव महत्त्वाचा आहे. एसटी अपघात झाल्यास नुकसानभरपाई दिली जाते.

किशोर गायकवाड, प्रवासी.

कोट...

खासगी वाहतुकीच्या तुलनेत बसचा प्रवास सुरक्षित आहे. अपघाताचे प्रमाण नगण्य आहे. शिवाय अपघात मृत्यू पडलेल्या व जखमींना नुकसानभरपाई दिली जात असते. आरामदायी प्रवासासाठी सिटर कम स्लिपर, शिवशाही बसेसही प्रवाशांच्या सेवेत आहेत. प्रवाशांना सुविधा देण्यावर महामंडळाचा अधिक भर असतो.

पांडुरंग पाटील, आगारप्रमुख, उस्मानाबाद.

Web Title: ST travel is safe, so why travel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.