काँग्रेसला ताकद देण्याचे काम लोहाऱ्यापासून सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:31 AM2021-09-13T04:31:23+5:302021-09-13T04:31:23+5:30
लोहारा : काँग्रेस पक्ष हा विचाराने माणसे जोडणारा पक्ष आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम पक्षामार्फत केले जाते. सध्या देशामध्ये ...
लोहारा : काँग्रेस पक्ष हा विचाराने माणसे जोडणारा पक्ष आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम पक्षामार्फत केले जाते. सध्या देशामध्ये धर्मा-धर्मांत भांडणे लावण्याचे काम सुरु आहे. अशा स्थितीत देश वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाला ताकद देण्याची गरज असून, या कामास लोहाऱ्यापासून सुरुवात करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.
रविवारी तालुका काँग्रेसच्या वतीने येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, सभापती हेमलता रणखांब, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. दीपक जवळगे, आबासाहेब साळुंके, बाजार समितीचे संचालक शंकर जट्टे, शरणाप्पा पत्रिके, गुंडू भुजबळ, तालुकाध्यक्ष अमोल पाटील, बुद्धिवंत साखरे, रफीक तांबोळी, सचिन पाटील, व्यंकट कोरे, शहरध्यक्ष के. डी. पाटील, हरी लोखंडे आदी उपस्थित होते.
या वेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनीही विचार मांडले. यावेळी संग्राम पाटील, रौफ बागवान, विठ्ठल पाटील, हरी लोखंडे, नितीन पाटील, ॲड. संगमेश्वर माशाळकर, माणिक चिकटे, ब्रम्हानंद पाटील, केशव सरवदे, महादेव टेंगळे, तानाजी माटे, रब्बानी नळेगावे, सत्यवान जगताप, बालाजी बिदे, सागर पाटील, इस्माईल मुल्ला, जगदिश पाटील, परमेश्वर चिकटे, प्रकाश होंडराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल पाटील, सूत्रसंचालन मुकेश सोनकांबळे यांनी केले तर आभार केशव सरवदे यांनी मानले.
चौकट....
पक्ष सोडणाऱ्यांना महत्त्व देऊ नका
लोहारा शहरातील काँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्यांची चर्चा करु नका, त्यांना महत्त्वही देऊ नका. लोक अज्ञान नाहीत. लोकांना सगळं माहिती आहे. फक्त बोलून दाखवत नाहीत. लोहारा नगरपंचायत निवडणूकच काय जि. प., प.स., सहकारी संस्थाच्या निवडणुकीत देखील काँग्रेस पक्षाला बळकटी आणू दाखवण्याची ग्वाही या वेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे यांनी दिली.
यांचा झाला प्रवेश
याप्रसंगी लोहारा शहरातील ओम पाटील, हणमंत गरड, गोपाळ संदीकर, वीर फावडे, कपिल माशाळकर, सचिन माळी, दिपक मुळे, जयसिंग बंडगर, लहू नारायणकर, महेश कुंभार यांच्यासह तालुक्यातील हिप्परगा (रवा), हराळी आदी गावांतील शिवसेना,राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.