लोहाऱ्यात धान्य खरेदी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:32 AM2021-03-05T04:32:24+5:302021-03-05T04:32:24+5:30
लोहारा : शहरात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. शासनाने आधारभूत धान्य ...
लोहारा : शहरात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. शासनाने आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी यशवंतराव चव्हाण कृषी उत्पादने विकास सहकारी संस्थेला दिली असून, आतापर्यंत ८०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ही नोंदणी शेतकऱ्याचा माल संपेपर्यंत सुरू राहणार आहे. खरेदीचा शुभारंभ किल्लारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी कदम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, दिनकरराव जावळे-पाटील, नगरसेवक अभिमान खराडे, तलाठी जगदीश लांडगे, प्रताप पाटील, सुधीर घोडके, विनोद जावळे, कुलदीप गोरे, गणेश भरारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो - लोहारा शहरातील शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी शिवाजी कदम, मोहन पणुरे, दिनकरराव जावळे पाटील, अभिमान खराडे, तलाठी जगदीश लांडगे, प्रताप पाटील, सुधीर घोडके, विनोद जावळे आदी.