मावेजाबाबत दिले प्रशासनाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:35 AM2021-04-23T04:35:03+5:302021-04-23T04:35:03+5:30
येडशी : कळंब तालुक्यातील चोराखळी येथील साठवण तलावासाठी अधिगृहित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळत नसल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ...
येडशी : कळंब तालुक्यातील चोराखळी येथील साठवण तलावासाठी अधिगृहित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळत नसल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
चोराखळी येथील साठवण तलावासाठी एकूण ८० शेतकऱ्यांच्या जमिनी अधिगृहित करण्यात आल्या असून, न्यायालयाच्या आदेशानुसार ८० शेतकऱ्यांना व्याजासह एक कोटीच्या आसपास रक्कम देण्यात आली. ही रक्कम माजी संरपच जनार्धन दाजीराम खुने, अंगद गुलाब माने, प्रताप कंकाळ, कल्याण कंकाळ यांच्या संयुक्त खात्यावरून शेतकऱ्यांना व वारसांना वितरित करण्यासाठी न्यायालयाकडून कॉमन शेषन मंजूर करुन घेण्यात आले होते. दरम्यानच्या काळात काही मूळ मालकांनी जमिनी विकून टाकल्या. परंतु, जमिनी विकत घेणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच मयताच्या सर्व वारसांना हे पैसे अद्याप मिळाले नसल्याची तक्रार भारत गुलाब शिंदे, कल्पना शिंदे, कुमार शिंदे, समाधान शिंदे, दशरथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.