बनियन-पँट घालून दिले पीक विम्यासाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:09+5:302021-05-29T04:25:09+5:30

उमरगा : चालू खरीप हंगामातील पेरणीपूर्वी २०२० खरीपाचा पीकविमा जमा करावा, तसेच चालू व ...

Statement for crop insurance wearing bunion-pants | बनियन-पँट घालून दिले पीक विम्यासाठी निवेदन

बनियन-पँट घालून दिले पीक विम्यासाठी निवेदन

googlenewsNext

उमरगा : चालू खरीप हंगामातील पेरणीपूर्वी २०२० खरीपाचा पीकविमा जमा करावा, तसेच चालू व थकीत शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने गुरुवारपासून गांधीगिरी मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. यात पहिल्या दिवशी संपूर्ण कपड्यानिशी तर शुक्रवारी शर्ट काढून बनियन व पँट घालून हे निवेदन देण्यात येणार आहे. मागणी मान्य होईपर्यंत दररोज एकेक कपडा कमी करून निवेदन दिले जाणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

शुक्रवारी येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे, गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, अवेळी किचकट ऑनलाईन फॉर्म भरण्याची अट घातल्याने खरीपाचा विमा अद्याप जमा झालेला नाही. पेरणी अगदी तोंडावर आलेली आहे. कोरोनामुळे शेतकऱ्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा २०२० खरीपाचा पीकविमा त्वरित जमा करावा.

सरकारने चालू व थकबाकीदार दोन्ही शेतकऱ्यांना तात्काळ कसल्याही किचकट अटी न घालता पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश बँकांना द्यावेत, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

या मागण्या मान्य होईपर्यंत गांधीगिरी मार्गाने लक्षवेधी आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे.

या आंदोलनात पहिला दिवस सपूर्ण कपड्यावर, दुसरा पँट व बनियनवर, तिसरा दिवस बनियन काढून केवळ पँटवर, चौथा दिवस केवळ चड्डीवर तर पाचव्या दिवसापर्यंत मागण्या मान्य न झाल्यास नग्न होऊन निवेदन दिले जाणार असल्याचे रामेश्वर सूर्यवंशी व इतरांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Statement for crop insurance wearing bunion-pants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.