पुतळा सुशोभीकरणाच्या कामास शिवराज्याभिषेक दिनी प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:25 AM2021-06-04T04:25:17+5:302021-06-04T04:25:17+5:30
छत्रपती शिवाजी महाराजाच्या अश्वारूढ पुतळ्यासह चौक सुशोभीकरण कामाच्या मूळ प्रस्तावामध्ये अनेक बाबी व सुधारणा अंतर्भूत केल्या आहेत. मूळ प्रस्तावात ...
छत्रपती शिवाजी महाराजाच्या अश्वारूढ पुतळ्यासह चौक सुशोभीकरण कामाच्या मूळ प्रस्तावामध्ये अनेक बाबी व सुधारणा अंतर्भूत केल्या आहेत. मूळ प्रस्तावात केवळ पुतळ्याचे स्थलांतर होते. यामध्ये नवीन संकल्पना मांडत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अनेक बदल सुचविले व चौकाचे सुशोभीकरणदेखील समाविष्ट केले. यामुळे किमतीत वाढ झाल्याने सदरील प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविणे आवश्यक होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना सूचना देऊन प्रस्ताव तातडीने नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. या विभागाचे सचिव महेश पाठक यांच्याकडे पाठपुरावा करून याची मंजुरी मिळवून घेतली. परंतु, कोविड-१९ निर्बंधामुळे तुळजापूर विकास प्राधिकरणाची बैठक घेणे शक्य नसल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार फिरता ठराव घेऊन यास प्रशासकीय मान्यता घेत कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आला आहे. संबंधित कंत्राटदारास हे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे रोचकरी म्हणाले.