मंदिरात भाविकांची फसवणूक थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:35 AM2021-03-09T04:35:36+5:302021-03-09T04:35:36+5:30
श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक देवी दर्शनासाठी येत असतात. सध्या कोरोना महामारीमुळे भाविकांना दर्शनासाठी मर्यादा ...
श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक देवी दर्शनासाठी येत असतात. सध्या कोरोना महामारीमुळे भाविकांना दर्शनासाठी मर्यादा असून, त्याचा गैरफायदा घेऊन काही बोगस व अनधिकृत लोक पुजारी वर्गाच्या वेशभूषेमध्ये भाविकांची मंदिर सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांसमक्ष फसवणूक करतात. हा प्रकार थांबविण्यासाठी श्री तुळजाभवानी मातेच्या हक्कदार पुजाऱ्यांसाठी अत्याधुनिक व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बायोमेट्रिक कार्ड तत्काळ मंदिर संस्थान मार्फत देण्यात यावे, तसेच मंदिर संस्थानमध्ये असणारे सीसीटीव्ही फुटेज पाहून, अनधिकृत एजंटवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी. मंदिरामधील दर्शन मंडपामधील प्रत्येक मजल्यावर व मंदिर परिसरामध्ये टीव्ही लावून त्यावर बोगस व अनधिकृत व्यक्तीपासून सावध रहा, अशी सूचना द्यावी, तसेच फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्रे व त्यांच्याशी निगडित संपूर्ण माहिती प्रकाशित करण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. यावर ॲड.धीरज जाधव, विजय भोसले, अर्जुन साळुंके, बाळासाहेब भोसले, अमर कंगले, सचिन जाधव यांच्या सह्या आहेत.