दरवाढीच्या विरोधात ‘वंचित’चा रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:39 AM2021-09-09T04:39:47+5:302021-09-09T04:39:47+5:30
केंद्र सरकारने गरीब जनतेची दिशाभूल करून मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले व सबसिडी मात्र दहा रुपये दिली. गॅस भरण्यासाठी ...
केंद्र सरकारने गरीब जनतेची दिशाभूल करून मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले व सबसिडी मात्र दहा रुपये दिली. गॅस भरण्यासाठी तब्बल ९२५ रुपये द्यावे लागत असल्याने जनतेच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. तसेच डिझेल व पेट्रोलचे दरही शंभरीपार गेल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. मोलमजुरी करणाऱ्यांची शासकीय मजुरी २३८ रुपये असून, ती ५०० रुपये करावी, इंधन दरवाढ कमी करावी, या मागण्यांसाठी पंढरपूर-खामगाव या महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले. कळंबचे पोलीस उपनिरीक्षक दराडे यांनी रस्तारोकोची माहिती प्रशासनास कळवून रस्ता पूर्ववत सुरु केला. यावेळी लक्ष्मण शिंदे, अच्युत शिंदे, विशाल ओहाळ, आप्पा शिंदे, संतोष शिंदे, राजाभाऊ ओव्हाळ, बालाजी घोडके, सूरज शिंदे, विकास शिंदे, विकी घोडके, भागवत जाधव, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
080921\img_20210908_094026.jpg
मस्सा ख येथील बातमी