दिव्यांच्या लखलखाटात रस्ते उजळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:33 AM2021-08-15T04:33:36+5:302021-08-15T04:33:36+5:30
लोहारा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील दुभाजकामध्ये बसविण्यात आलेल्या हायमास्ट पथदिव्यांचे ...
लोहारा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील दुभाजकामध्ये बसविण्यात आलेल्या हायमास्ट पथदिव्यांचे लोकार्पण पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यामुळे हे रस्ते आता दिव्यांच्या लखलखाटात उजळून निघाले आहेत.
शहरातील बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा बसवेश्वर चौकदरम्यान पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी दुभाजक करण्यात आले आहेत. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडर चौकदरम्यान असलेल्या दुभाजकामध्ये पथदिवे बसविण्यात आले नव्हते. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांची गैरसोय होत होती. अखेर नगरपंचायतीने जिल्हा नियोजन समितीच्या नगरोत्थान योजनेतून २५ लाख रुपयांच्या उपलब्ध निधीतून दुभाजकामध्ये हायमास्ट पथदिवे बसविले. तसेच शहरातील अन्य मुख्य चौकातही हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. शनिवारी पथदिव्यांचे लोकार्पण पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहायक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, अधीक्षक जगदीश सोंडगे, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, शहरप्रमुख सलीम शेख, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, श्याम नारायणकर, श्रीकांत भरारे, नामदेव लोभे, दीपक रोडगे, अभिमान खराडे, परवेज तांबोळी, श्रीशैल स्वामी, जगन्नाथ पाटील, सुधीर घोडके, नितीन जाधव, कुलदीप गोरे, राजू रवळे, नागराळच्या सरपंच रीतू गोरे, आदी उपस्थित होते.