खून प्रकरणातील आराेपींना कठाेर शिक्षा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:38 AM2021-08-14T04:38:06+5:302021-08-14T04:38:06+5:30
उमरगा : कलदेव निंबाळा येथील खून प्रकरणातील आराेपींना कठाेर शिक्षा करावी, अशी मागणी तालुका चर्मकार संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी ...
उमरगा : कलदेव निंबाळा येथील खून प्रकरणातील आराेपींना कठाेर शिक्षा करावी, अशी मागणी तालुका चर्मकार संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे १३ ऑगस्ट रोजी करण्यात आली. यावेळी पदाधिकारी उपस्थित हाेते.
चर्मकार समाजातील नीळकंठ विठोबा कांबळे (रा. कलदेव निंबाळा) यांचा १० ऑगस्ट रोजी रात्री शेतात झोपलेले डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून खून केला. ही घटना संबंधित आराेपींनी संगनमताने केली आहे. या घटनेतील आराेपींना कठाेर शिक्षा करून कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी चर्मकार संघटनेच्या वतीने करण्यात आली. मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी उदमले यांना देण्यात आले. यावेळी शिवाजी वाकळे, ॲड. राजीव गणगे, सचिन बिद्री, रावण कांबळे, अण्णाराव कांबळे, सुभाष सूर्यवंशी, संदीप दामावले, माणिकराव कदेरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.