‘ज्ञान प्रसार’चे विद्यार्थी चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:57+5:302021-07-22T04:20:57+5:30
मोहा : येथील ज्ञान प्रसार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ...
मोहा : येथील ज्ञान प्रसार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य शरद खंदारे तर शालेय समितीचे अध्यक्ष बाबासाहेब मडके, मोहेकर मल्टिस्टेटचे चेअरमन हनुमंत मडके, संचालक तात्यासाहेब पाटील, प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर, सोसायटीचे चेअरमन गौतम मडके, पर्यवेक्षक वाय. बी. सावंत, प्रा. आप्पासाहेब मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या परीक्षेत वैष्णवी माळी, क्रांती मडके, अजित झोरी, माधुरी मडके, रोहन मडके, अनुजा लोमटे, शाहेद शेख, सई मडके, स्नेहा कसबे, या गुणवंतांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन बी. एन. काळे यांनी केले. कार्यक्रमासाठी सहशिक्षक संजय मडके, संजय आडने, सतीश मडके, अमरसिंह पाटील, एस. एन. गुंगे, जे. डी. भामरे, कमलाकर शेवाळे, एन. बी. अनंत्रे, शैलेश गुरव, एस. बी. सोलनकर, नीता सोनवणे यांनी पुढाकार घेतला.
200721\4656img-20210720-wa0083.jpg
ज्ञान प्रसार विद्यालयात दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर दिसत आहे