विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:56 AM2021-03-13T04:56:55+5:302021-03-13T04:56:55+5:30

उस्मानाबाद : तुम्ही कुठे शिकता, हे महत्त्वाचे नसून तुम्ही जे शिकलात ते किती आत्मसात केले आहे हे महत्त्वाचे आहे. ...

Students need to update their knowledge | विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत करण्याची गरज

विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत करण्याची गरज

googlenewsNext

उस्मानाबाद : तुम्ही कुठे शिकता, हे महत्त्वाचे नसून तुम्ही जे शिकलात ते किती आत्मसात केले आहे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत केले तर यश नक्की मिळेल. भाषेचा न्यूनगंड न बाळगता आपल्या कार्यक्षेत्रात मनापासून काम करा, असे आवाहन येथील तेरणा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महेश दुपली यांनी केले.

बेसिक सायन्स ऍण्ड हुमानिटीज विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या पालक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, विभाग प्रमुख प्रा. उषा वडणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दुपली यांनी थेट जर्मनीमधून विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनीही मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख प्रा. उषा वडणे यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्याचा लेखाजोखा मांडला. यावेळी शुभम काकडे अफान सय्यद, शिवम अंगीतकर यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रश्न विचारले. सूत्रसंचालन प्रा. अर्जुन यादव यांनी केले तर आभार प्रा योगिता अजमेरा यांनी मानले. या ऑनलाइन पालक मेळाव्यासाठी प्रा. उदय मस्के, प्रा. बालाजी चव्हाण, प्रा. मनोज जोशी आदी उपस्थित होते.

Web Title: Students need to update their knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.