‘आपला बप्पा आपण बनवू’ कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:33 AM2021-09-11T04:33:05+5:302021-09-11T04:33:05+5:30

कळंब : ‘आपला बप्पा आपण बनवूया’ ही संकल्पना घेऊन रोटरी क्लब ऑफ कळंब सीटी व अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कळंब ...

Students respond to the workshop 'Let's make your father' | ‘आपला बप्पा आपण बनवू’ कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

‘आपला बप्पा आपण बनवू’ कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

googlenewsNext

कळंब : ‘आपला बप्पा आपण बनवूया’ ही संकल्पना घेऊन रोटरी क्लब ऑफ कळंब सीटी व अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कळंब यांच्या पुढाकारातून कळंब येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

येथील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शाडू, मातीचे गणपती प्रशिक्षण कार्यशाळा व निर्माल्य विघटन कसे करायचे, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. मुलांना गणपतीची महती सांगत गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी का सुरू केला, त्या मागची त्यांची संकल्पना काय होती, शाडू मातीचे गणपती मूर्तीच का स्थापन करावी व त्यापासून पर्यावरणाची हानी कशी रोखता येते, याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

कोविड १९ च्या प्रभावामुळे संख्येला मर्यादा असल्याने ऑनलाईनद्वारे प्रशिक्षण व मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. या कार्यशाळेत ऑफलाईन ५० व ऑनलाईन २५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आकर्षक पर्यावरणपूरक मातीचे गणपती तयार केले व हेच गणपती घरी स्थापना करण्याचा संकल्प केला. प्रशिक्षक म्हणून संतोष लिमकर व शरद अडसूळ यांनी काम पाहिले. विद्यालयातील सहशिक्षक रमेश आंबिरकर यांनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेसाठी रोटरीचे अध्यक्ष धर्मेंद्र शहा, सचिव अरविंद शिंदे, अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी राऊत, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. सचिन पवार, हर्षद अंबुरे, संजय घुले, डॉ. नीलकंठ चोपणे, सुशील तीर्थकर यांनी पुढाकार घेतला. प्रोजेक्ट चेअरमन म्हणून किशोर मोरे यांनी काम पाहिले.

Web Title: Students respond to the workshop 'Let's make your father'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.