‘छान-छान गाेष्टी’तून विद्यार्थ्यांना बाेधन अन् मनाेरंजनही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:04+5:302021-06-05T04:24:04+5:30

उमरगा : कोरोना संसर्गाच्या या काळात गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणातही आता मुलांना रस राहिला नाही. ...

The students were also entertained by the 'nice-good' | ‘छान-छान गाेष्टी’तून विद्यार्थ्यांना बाेधन अन् मनाेरंजनही

‘छान-छान गाेष्टी’तून विद्यार्थ्यांना बाेधन अन् मनाेरंजनही

googlenewsNext

उमरगा :

कोरोना संसर्गाच्या या काळात गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणातही आता मुलांना रस राहिला नाही. घरात बसूनही मुले कंटाळली आहेत. अशा परिस्थितीत येणेगूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका उषा गाडे-इंगळे यांनी ‘छान-छान गोष्टी ऐकू या’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. आणि यामुळे सर्वच बाबतीत कंटाळलेल्या विद्यार्थ्यांचे मनोरंजन करणे सुरू केले आहे. नुसते मनोरंजनच नाही तर मनोरंजनासोबत विद्यार्थ्यांना बोध देणेही सुरू आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत गोष्टी ऐकायला सर्वांनाच आवडतात. हेच सूत्र पकडून ‘छान-छान गोष्टी ऐकू या’ हा उपक्रम उषा गाडे यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केला. एखादी छानशी गोष्ट स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करायची. या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर मंद संगीत द्यायचे. त्याची ऑडिओ क्लिप तयार करायची व त्या ऑडिओ क्लिपची लिंक तयार करून विद्यार्थ्यांना पाठवायची. विद्यार्थ्यांनी लिंकवर क्लिक करताच गाेस्ट सुरू हाेते. या उपक्रमामध्ये सातत्य असल्याने विद्यार्थी उत्सुकतेने गोष्टी ऐकत आहेत व गोष्टीतून बोध मिळत असल्याने नकळतपणे मूल्यशिक्षणही होत आहे. हा उपक्रम आपल्या शाळेपुरता मर्यादित न ठेवता त्यांनी सर्वांसाठी खुला केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. विविध व्हाॅट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक हा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत.‌ हा उपक्रम गेल्या दोन महिन्यांपासून अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमात आतापर्यंत तब्बल पन्नास गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोना काळातील सर्वेक्षण, लसीकरण नियोजन आदी प्रशासनाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांचा हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून काैतुक हाेत आहे.

मुलांचे श्रवण कौशल्य व कथाकथन कौशल्य विकसित करणे, मुलांची तार्किकता वाढवणे, मुलांमध्ये संस्कार व मूल्य रुजवणे आणि मुलांचे मनोरंजन करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. दररोज विद्यार्थी कथेची लिंक कधी येईल, याची वाट बघत असतात. मुलांबरोबरच आता शिक्षक, पालकही या गोष्टी आवडीने ऐकत आहेत आणि आपल्या मुलांना ऐकवत आहेत. कोरोना काळात शाळा बंद असलेल्या परिस्थितीत मुलांशी या उपक्रमाद्वारे संपर्कात राहता आले, याचा आनंद आहे.

- उषा गाडे-इंगळे, जि. प. प्राथमिक शाळा, येणेगूर.

Web Title: The students were also entertained by the 'nice-good'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.