उस्मानाबादला २४ तास पाणीपुरवठ्यासाठी अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:15 AM2021-01-24T04:15:23+5:302021-01-24T04:15:23+5:30

उस्मानाबाद - शहराला चाेवीस तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र सरकारच्या ‘युआयडीएसएसएमटी’ व अमृत याेजना मंजूर करण्ययात आल्या. ...

Submit report for 24 hours water supply to Osmanabad | उस्मानाबादला २४ तास पाणीपुरवठ्यासाठी अहवाल सादर करा

उस्मानाबादला २४ तास पाणीपुरवठ्यासाठी अहवाल सादर करा

googlenewsNext

उस्मानाबाद - शहराला चाेवीस तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र सरकारच्या ‘युआयडीएसएसएमटी’ व अमृत याेजना मंजूर करण्ययात आल्या. या याेजनेद्वारे शहरास चाेवीस तास पाणीपुरवठ्याचे नियाेजन हाेते. परंतु, यानअुषंगाने पाऊले उचलली जात नसल्याने आजही उस्मानाबादकरांना चाेवीस तास मिळत नाही. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करावयाच्या उपायाेजनांचा अहवाल १० दिवसांत सादर करावा, अशी सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

केंद्र सरकारच्या ‘युआयडीएसएसएमटी’ व अमृत याेजनेतून पहिल्या टप्प्यात ८ ‘एमएलडी’ क्षमतेची योजना कार्यान्वित करणे. दुसऱ्या टप्प्यात योजनेची क्षमता ८ वरून १६ ‘एमएलडी’ करणे तसेच आवश्यक जलकुंभ, अंतर्गत पाईपलाईन व जलशुद्धीकरण केंद्र उभारणे तर तिसऱ्या टप्प्यात अंतर्गत पाईपलाईनचे काम पुर्ण करून मिटरद्वारे शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजित होते. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अमृत याेजनेतून नव्याने उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन नुकतेच झाले. मात्र २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेच्या अनुषंगाने ठोस पावले उचलली जात नसल्याची बाब समाेर आल्यानंतर २० जानेवारी राजी आमदार पाटील यांनी नगर परिषद व प्राधिकरणाच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी वाढीव क्षमता उपलब्ध झाल्यानंतर सध्यस्थितीत उजनी जलाशयातून उस्मानाबाद शहरात नेमके किती पाणी येते? याबाबत आ. पाटील यांनी विचारणा केली असता, पाणीपुरवठा अभियंता नरे यांनी ‘फ्लो-मीटर’ नादुरुस्त असल्याचे धक्कादायक विधान केले. तसेच आजही शहर वासियांना ६ दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले. यानंतर आ. पाटील यांनी पालिका मुख्याधिकारी येलगट्टे यांना शहरास २४ तास पाणी देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपायाेजनांचा अहवाल १० दिवसांत द्यावा .तसेच शहरानजीकच्या तेरणा व रूईभर या स्त्रोतातून जास्तीत जास्त पाणी उचलण्याबाबत सूचना केली. बैठकीस उपनगराध्यक्ष अभय इंगळे, मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे, विरोधी पक्ष नेते युवराज नळे, पाणीपुरवठा सभापती अंजना पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रमेश ढवळे, शाखा अभियंता सुजित जाधव, पाणीपुरवठा अभियंता अक्षय नरे आदींची उपस्थिती हाेती.

चाैकट.....

याेजनेचे काम अपेक्षित गतीने झाले नाही..

२०१३ मध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना, अंतर्गत जलवाहिनी व वाढीव क्षमतेच्या जलकुंभांची कामे पूर्ण झालेली नसतानाही आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून शहरातील नागरिकांना ४ दिवसाआड पाणी दिले जात होते. २०१६ नंतर ज्या गतीने योजनेचे काम व्हायला हवे होते त्यानुसार झाले नाही. त्यामुळे शहराला २४ तास पाणी देता येत नाही. एवढेच नाही शहरातील १५ ते २० टक्के भागात खास करून हद्दवाढ परिसरात पाइपलाइनचे काम अद्याप शिल्लक आहे. याचाही परिणाम पाणीपुरवठ्यावर हाेत असल्याचे बैठकीतून समाेर आले.

Web Title: Submit report for 24 hours water supply to Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.