मकर संक्रांतीच्या तोंडावर साखर, तीळ, गुळाचे दर स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:23 AM2020-12-27T04:23:24+5:302020-12-27T04:23:24+5:30
दरवर्षी लाॅकडाऊन काळात साखर, गूळ, तिळाचे दर वाढतात. यंदा लाॅकडाऊनमध्ये साखर व गुळाचे दर वधारले होते. साखर ३४ रुपये ...
दरवर्षी लाॅकडाऊन काळात साखर, गूळ, तिळाचे दर वाढतात. यंदा लाॅकडाऊनमध्ये साखर व गुळाचे दर वधारले होते. साखर ३४ रुपये किलोने विक्री होत होती. केरळ सरकारने प्रत्येक कुटुंबास अर्धा किलो गूळ वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गुळाचा दर ४५ रुपये किलोवर पोहोचला होता. मात्र, दिवाळीनंतर साखर व गुळाचे दर खाली आले आहेत. साखर ३२ ते ३३ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे, तर गूळ ३० रुपये किलोने विक्रीस उपलब्ध आहे. तिळाचे दरही गतवर्षीप्रमाणेच आहेत. गेल्या वर्षी संक्रातीला तिळाचा दर ११३ रुपये ते १२० रुपये किलो होता. यावर्षीही तिळाचे दर स्थिरच आहेत. सध्या तीळ १२० ते १२३ रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहेत.
कोट...
यंदा उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे साखरेला उठाव नाही. त्यामुळे गूळ व साखरेचे दर घसरले आहेत. तिळाचे दर गतवर्षीच्या तुलनेत स्थिरच आहेत.
अमित भराटे, व्यापारी
लाॅकडाऊन काळात साखर, गुळाचे दर वाढले होते. संक्राती सणाच्या तोंडावर साखर, गुळाचे दर कमी झाले आहेत. तिळाचे दरही आवाक्यात आहेत. त्यामुळे काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
सीमा बनसोडे, गृहिणी
चौकटी...
तिळाचा दर स्थिर
संक्रातीच्या तोंडावर तिळाला मागणी असते. त्यामुळे तिळाचे दर वाढत असतात. मात्र, यंदा तिळाचे दर स्थिर आहेत. सध्या तिळाची १२३ ते १२५ रुपये किलोने विक्री होत आहे.
गुळाचा भाव झाला कमी
लाॅकडाऊन काळात गुळाचा दर ४५ रुपये किलोवर जाऊन ठेपला होता. मागील दोन महिन्यांपासून गुळाचा दर कमी झाला असून, गूळ ३० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.
साखरेचे भाव
लाॅकडाऊमध्ये साखर ३४ रुपये किलोने विक्री होत होती. दिवाळी सणापर्यंत साखरेचा दर तोच होता. मात्र, मागील महिन्यापासून साखरेच्या दरात घसरण झाली आहे. साखर ३२ रुपये ते ३३ रुपये किलोने विक्री होत आहे.