‘सुंदर गाव’ उपक्रमास गोंधळवाडीत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:32 AM2021-02-10T04:32:32+5:302021-02-10T04:32:32+5:30

(फोटो : संतोष मगर ०९) तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी ग्रामपंचायतमध्ये ‘माझा गाव, सुंदर गाव’ या उपक्रमास सोमवारी सरपंच ...

‘Sundar Gaon’ initiative started in Gondhalwadi | ‘सुंदर गाव’ उपक्रमास गोंधळवाडीत प्रारंभ

‘सुंदर गाव’ उपक्रमास गोंधळवाडीत प्रारंभ

googlenewsNext

(फोटो : संतोष मगर ०९)

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी ग्रामपंचायतमध्ये ‘माझा गाव, सुंदर गाव’ या उपक्रमास सोमवारी सरपंच राजाभाऊ मोटे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी उपसरपंच गोपाळ मोटे, ग्रामपंचायत सदस्य कालिंदा माने, कल्पना सातपुते, सविता मोटे, भैय्या पारसे, ग्रामसेविका बी. व्ही. देवकते, जिल्हा परिषद शाळेचे कुलकर्णी, राऊत, अंगणवाडी कार्यकर्ती माने, दुधाळ, आशा कार्यकर्ती संगीता मोटे, माजी सरपंच अमृत मोटे, विष्णू मोटे आदी उपस्थित होते.

‘कोरोना डेज’ पुस्तकाचे प्रकाशन

(फोटो : युवराज नळे ०९)

उस्मानाबाद : येथील शांतिदूत परिवाराद्वारे युवराज नळे लिखित‘कोरोना डेज’ या पुस्तकाचे प्रकाशन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अरविंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जि. प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, मसाप अध्यक्ष नितीन तावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या पुस्तकाच्या वाचनातून कोरोनाविषयी जाणीव-जागृती होणार आहे. म्हणूनच जिल्ह्यातील १०० वाचनालये व शैक्षणिक संस्थांना 'कोरोना डेज' पुस्तकाचे वाटप करण्यात येईल, असे आ. पाटील यांनी यावेळी घोषित केले. कार्यक्रमास राजेंद्र अत्रे, माधव गरड, शेषनाथ वाघ, तौफिक शेख, हनुमंत पडवळ, बाळ पाटील, डॉ. कृष्णा तेरकर, प्रा. प्रशांत गुरव, प्रा. अभिमान हंगरगेकर, गणेश वाघमारे, बाबा गुळीग, डॉ. ‌रुपेशकुमार जावळे ॲड. कुलदीपसिंह भोसले आदींचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रभाकर चोराखळीकर यांनी केले. आभार प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी मानले.

सरपंचपदी कोडगिरे, उपसरपंचपदी डावरे

(फोटो : संतोष मगर ०९)

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पुनमताई गौरीशंकर कोडगिरे, तर उपसरपंचपदी प्रकाश डावरे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून एम. जी. कुलकर्णी उपस्थित होते. त्यांना ग्रामसेवक एस. एस. चौगुले यांनी सहकार्य केले. यावेळी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव चुंगे, कुलस्वामिनी सुतगिरणीचे संचालक गौरीशंकर कोडगिरे, माजी सरपंच बिरूदेव लोकरे, ग्रामपंचायत सदस्य सूरज पाटील, विश्वजीत चुंगे, ग्रामपंचायत सदस्य हर्षा चुंगे, कमलबाई काळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

जवळगा (मे) येथे समर्थकांचा जल्लोष

(फोटो : रणजीत मोरे ०९)

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मे )येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नवनाथ जगताप तर उपसरपंचपदी मंडाबाई मस्के यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. याबद्दल समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाखा अभियंता सुनीलसिंग बायस तसेच येथील ग्रामसेवक निलेश सूर्यवंशी उपस्थित होते. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपप्रणीत जन विकास पॅनल व काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत होऊन नऊपैकी सात जागेवर जनविकास पॅनेलने विजय मिळवीत सत्ता स्थापन केली. यावेळी बालाजी जगताप, लक्ष्मण इंगळे, राजेंद्र वाघ, दिलीप भुसारे, सौदागर नरवडे, नवनाथ नन्नवरे, हरिदास देशमुख, अप्पाराव निकम, सुभाष ननवरे, ज्ञानेश्वर नंन्नवरे, धर्मराज लोखंडे, रघुनाथ वाघ, दगडू लोखंडे, दगडू मुरकुटे, भैरवनाथ लोखंडे, पंडित मस्के, पंडित मेटे, महादेव इंगळे, प्रदीप पांढरे आदी उपस्थित होते.

नांदुरी ग्रामपंचायतीत दोन पॅनल एकत्र

(फोटो : नांदुरी ग्रामपंचायत ०९)

तुळजापूर : तालुक्यातील नांदुरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनल, देवराज परिवर्तन पॅनल व धैर्यशिल भैय्या ग्रामविकास पॅनल यांच्यात सामना रंगला होता. विशेष म्हणजे, मतदारांनी तिन्ही पॅनलला सारखाच कौल दिल्याने तिघांचेही प्रत्येकी तीन उमेदवार विजयी झाले. त्यामुळे सत्ता कोणाची स्थापन होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर ग्रामविकास परिवर्तन पॅनल व देवराज पॅनलने एकत्रीत येत सत्ता स्थापन केली. यामुळे धैर्यशिल भैय्या ग्रामविकास पॅनल सत्तेपासून बाजुला राहिले. सोमवारी देवराज पॅनलच्या श्यामलताई मोहन मुळे यांची सरपंचपदी तर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे हणमंत हरिहर पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. ग्रामस्थांनी सत्ता स्थापित सदस्यांचा सत्कार केला.

Web Title: ‘Sundar Gaon’ initiative started in Gondhalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.