मनोज जरांगेंना पाठिंबा, धाराशिवमध्ये मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन !
By बाबुराव चव्हाण | Published: July 22, 2024 05:30 PM2024-07-22T17:30:51+5:302024-07-22T17:31:12+5:30
धाराशिव लगतच्या हातलाई तलावात जलसमाधी आंदोलन
धाराशिव : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयऱ्यांचा आद्यादेश तातडीने लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवालीत पाचव्यांदा उपोषण सुरू केले आहे. उपोषणा दरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, राज्य शासनाकडून कोणतीच भूमिका घेतली जात नाही. यामुळे राज्य शासनाच्या विरोधात व जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा तरुणांनी धाराशिव लगतच्या हातलाई तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासनाने मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे तरुणांनी सांगितले. जलसमाधी आंदोलनात प्रजय पवार, प्रकाश पाटील, तेजस बोबडे, अभिजीत सूर्यवंशी, निखिल जगताप, अक्षय नाईकवाडी, पांडुरंग तुपे, राहुल गुटे यांचा समावेश आहे.