फुप्फुसाव्यतिरिक्त अन्य अवयवांवरही ‘टीबी’ जिवाणूचा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:54+5:302021-06-04T04:24:54+5:30

धक्कादायक : चार वर्षांत सुमारे दीड हजारावर रुग्णांची भर उस्मानाबाद : आजवर क्षयराेगास (टीबी) फुप्फुसाचा आजार म्हणून ओळखले जायचे; ...

The TB bacterium attacks other organs besides the lungs | फुप्फुसाव्यतिरिक्त अन्य अवयवांवरही ‘टीबी’ जिवाणूचा अटॅक

फुप्फुसाव्यतिरिक्त अन्य अवयवांवरही ‘टीबी’ जिवाणूचा अटॅक

googlenewsNext

धक्कादायक : चार वर्षांत सुमारे दीड हजारावर रुग्णांची भर

उस्मानाबाद : आजवर क्षयराेगास (टीबी) फुप्फुसाचा आजार म्हणून ओळखले जायचे; परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे ‘टीबी’ या जिवाणूने आपला माेर्चा शरीरातील अन्य अवयवांकडेही वळविला आहे. त्यामुळेच की काय, मागील तीन-चार वर्षांपासून फुप्फुसाव्यतिरिक्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. सुमारे १ हजार ५३० अशा नवीन प्रकारातील रुग्णांची भर पडली आहे. ही बाब आराेग्य यंत्रणेची चिंता वाढविणारी मानली जात आहे. चिंतेचा बाब यासाठी की, अशा रुग्णांचे निदान करण्यासाठीची आवश्यक साधणे आजही शासकीय दवाखान्यांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे तूर्तास तरी क्षयराेग विभागाला खाजगी दवाखान्यांच्या रिपाेर्टवरच अवलंबून राहावे लागत आहे.

क्षयराेग हा संक्रमक राेग आहे. त्यामुळे हा आजार संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात पसरताे. या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर फुप्फुसावर प्रतिकूल परिणाम करतात. ज्यामुळे खाेकला, रक्ताची थुंकी, ताप तसेच वजन कमी हाेणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे ‘टीबी’ला फुप्फुसाचा आजार म्हणूनही ओळखले जाते; परंतु मागील तीन-चार वर्षांपासून ‘टीबी’चा जिवाणू फुप्फुसाव्यतिरिक्त मानवी शरीरातील लिम्प नाेड्स, हाडे, मेंदू, आतडे, मूत्रपिंडासारख्या इतर अवयवांवर अटॅक करू लागला आहे. जिल्ह्यात अशा रुग्णांचे प्रमाण वर्षागणिक वाढू लागले आहे. त्यामुळे स्थानिक आराेग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. मागील चार वर्षांत जिल्ह्यात थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल १ हजार ५३० असे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये २०१७ मध्ये ३४९, २०१८ मध्ये ४३९, २०१९ मध्ये ४००, २०२० मध्ये २९२ तर चालू वर्षात म्हणजेच २०२१ मधील पाच रुग्णांचा समावेश आहे. फुप्फुसाव्यतिरिक्त अन्य अवयवांचा टीबी झालेल्या रुग्णांवर शासकीय यंत्रणेकडे औषधाेपचार आहेत; परंतु अशा रुग्णांचे निदान करण्यासाठीची सुविधा येथील शासकीय आराेग्य यंत्रणेकडे नाही. मेडिकल काॅलेज असल्यास अशा रुग्णांचे निदान हाेऊ शकते; परंतु आपल्याकडे मेडिकल काॅलेजही नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचे रुग्ण थेट खाजगी दवाखाने गाठतात. या ठिकाणी निदान झाल्यानंतर तेथेच उपचारही केले जातात. त्यामुळे खाजगी दवाखान्यांच्या रिपाेर्टिंगवरच शासकीय यंत्रणेची भिस्त आहे. उपराेक्त अडचण लक्षात घेता, शासनाने अशा रुग्णांच्या निदानासाठी लागणारी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

चाैकट...

दृष्टिक्षेपात क्षयरुग्ण

वर्ष संख्या

२०१७ १६८६

२०१८ १९१४

२०१९ १८८५

२०२० १४४५

२०२१ ४११

(जानेवारी ते मे)

९३ जणांना टीबीसाेबतच ‘एचआयव्ही’

क्षयराेग विभागाने राबविलेल्या माेहिमेत २०२० मध्ये सुमारे ९३८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सुमारे ८८८ रुग्णांची ‘एचआयव्ही’ टेस्ट करण्यात आली. तपासणीअंती जवळपास ९३ जणांना ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे समाेर आले आहे. ही बाबही चिंताजनकच मानली जात आहे.

काेट...

मागील तीन वर्षांपर्यंत रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत हाेती; परंतु मध्यंतरी म्हणजेच काेराेनाच्या पहिल्या लाटेपूर्वी आपण डाेअर टू डाेअर जाऊन शाेधमाेहीम राबविली. या माध्यमातून सुमारे २ हजार ९४५ संशयित रुग्ण आढळून आले हाेते. स्फुटम तपासणी व एक्स-रे काढल्यानंतर ३९१ जणांना टीबी झाल्याचे समाेर आले. त्यामुळे चालू वर्षात फारसे रुग्ण आढळून आले नाहीत. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा सक्सेस रेटही जास्त आहे. काेराेनाच्या काळातही प्रत्येक रुग्णापर्यंत औषधे पाेहाेचविली आहेत. त्यामुळे सामन्य रुग्ण गंभीर झाल्याची एकही केस आपल्याकडे नाही.

-डाॅ. रफिक अन्सारी, जिल्हा क्षयराेग अधिकारी, उस्मानाबाद.

Web Title: The TB bacterium attacks other organs besides the lungs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.