सारोळ्या दहा बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:29+5:302021-07-14T04:37:29+5:30

कोरोना रुग्णावर गावातच होणार मोफत उपचार उस्मानाबाद : तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे स्वयंम शिक्षण प्रयोग व ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने कोरोनाच्या ...

Ten-bed isolation center started | सारोळ्या दहा बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू

सारोळ्या दहा बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू

googlenewsNext

कोरोना रुग्णावर गावातच होणार मोफत उपचार

उस्मानाबाद : तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे स्वयंम शिक्षण प्रयोग व ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गावातील जिल्हा परिषद शाळेत दहा बेडचे अद्ययावत आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्‌घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले तसेच माजी मंत्री आ. राणाजगतिसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास निधी मधून बांधण्यात येत असलेल्या सभागृह कामाचेही भूमिपूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.

या आयसोलेशन सेंटरमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. याठिकाणी १० बेडची व्यवस्था असून, अद्यावत अशी सुविधा देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत हे गाव कोरोनामुक्त आहे. मात्र, संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यास गैरसोय होऊ नये, यासाठी सरपंच प्रशांत रणदिवे यांच्या पाठपुराव्यांतून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.

गावातील मागासवर्गीय वस्तीमध्ये सभागृह उभारण्याची मागणी समाजबांधव गत १५ वर्षांपासून करत होते. त्याची दखल घेत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार स्थानिक विकास निधीमधून १० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या सभागृह कामाचेही मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सभापती दत्तात्रय देवळकर, गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित काकडे, स्वयंम शिक्षण प्रयोगचे किरण माने, नसीम मॅडम, मुजावर, सरपंच प्रशांत रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, सुधाकर देवगिरे, सावन देवगिरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश देवगिरे, रमेश रणदिवे, दलितमित्र पांडुरंग कठारे, अमर बाकले, भालचंद्र कठारे, खंडू शिंदे, अशोक परीट, रावसाहेब मसे, प्रदीप वाघ, ग्रामसेवक योगेश मुंढे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Ten-bed isolation center started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.