दहा काेविड केअर सेंटर पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:56 AM2021-03-13T04:56:53+5:302021-03-13T04:56:53+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून ...

Ten Cavid Care Centers reopen | दहा काेविड केअर सेंटर पुन्हा सुरू

दहा काेविड केअर सेंटर पुन्हा सुरू

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून उपायाेजना हाती घेतल्या आहेत. मध्यंतरी संसर्ग ओसरल्यानंतर बंद केलेले काेविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आराेग्य यंत्रणेला दिले हाेते. त्यानुसार दहा इमारती ताब्यात घेऊन १ हजार २६० बेडची व्यवस्था केली आहे.

कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधि‍क वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पूर्वतयारी करणे आवश्यक. या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होवू नये व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील दहा ठिकाणच्या इमारती ताब्यात घेऊन तेथे आरोग्य विभागाच्या अधिनस्त “डेडिकेटेड कोविड केअर सेंटर” स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले हाेते. त्यानुसार पॉलीटेक्नीक मुलांचे वसतीगृह प्रथम वर्ष जुनी बिल्डिंग, मुलींचे वसतीगृह द्वितीय व तृतीय वर्ष नवी बिल्डींग (बेड २१०), अनु.जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, वैराग रोड (बेड १००), तुळजापूर येथील १२४ भक्त निवास, यात्रा मैदान (बेड ३००), मुरुम येथील अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा (बेड १२०), उमरगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीपर्पज शासकीय मुलांचे वसतिगृह (बेड ४०), लोहारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह (बेड १००), भूम येथील शासकीय मुलांचे वसतिगृह (बेड १२०), परंडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह (बेड १००), कळंब येथील आय. टी. आय. (बेड ८०) तर वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे, मुलींचे वसतिगृहात ९० अशी एकूण १ हजार २६० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

चाैकट...

जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार दहा इमारती ताब्यात घेऊन मनुष्यबळही नियुक्त करण्यात आले आहे. सदरील काेविड केअर सेंटरवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी तालुका आराेग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर साेपविण्यात आली आहे. नाेडल आफिसर म्हणून जिल्हा आराेग्य अधिकारी काम पाहतील.

-डाॅ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी.

Web Title: Ten Cavid Care Centers reopen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.