'मुलाचा मृतदेह शिवारात पडलाय'; मध्यरात्रीचा फोन अन् कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

By चेतनकुमार धनुरे | Published: July 1, 2023 07:46 PM2023-07-01T19:46:28+5:302023-07-01T19:46:40+5:30

पार्टीसाठी गेलेल्या तरुणाचा शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याचे स्पष्ट

'The body of the son is lying in the ditch'; A midnight phone call brought grief to the family | 'मुलाचा मृतदेह शिवारात पडलाय'; मध्यरात्रीचा फोन अन् कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

'मुलाचा मृतदेह शिवारात पडलाय'; मध्यरात्रीचा फोन अन् कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

googlenewsNext

धाराशिव : बाजार करुन आल्यानंतर सायंकाळी पार्टीसाठी गेलेल्या एका तरुणाचा खून झाल्याची घटना मांडवा शिवारात शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलिसांनी शनिवारी सकाळी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपीस अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. पोलिसांनी तातडीने तपास करण्याचा शब्द दिल्यानंतर दुपारी मृतदेह ताब्यात घेतला.

कळंब तालुक्यातील ईटकूर येथील राहूल रणजित फरताडे (२७) हा तरुण आपल्या आई-वडिलांसोबतच वास्तव्याला होता. तो त्यांना शेतीकामात मदत करीत असत. शुक्रवारी सायंकाळी त्याने घरी लागणारे साहित्य दुकानांतून आणून पिशवी घरी दिली. यानंतर तो बाहेर गेला. सायंकाळी ७ वाजता राहूलचे वडील घरी आल्यानंतर त्यांनी विचारणा केली असता राहूल बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. रात्री उशीर होत असल्याने राहूल याच्या पत्नीने फोनवरुन विचारणा केली असता पार्टी असल्याने बाहेरच जेवण करुन येतो, असे सांगितले होते. 

दरम्यान, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राहूलच्या वडिलांचा फोन वाजला. पलिकडून त्यांच्या मुलाचा मृतदेह मांडवा शिवारातील पारधी पेढीजवळ पडल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी जावून पाहिले असता डोक्यात व गालावर शस्त्राने वार करुन राहूलचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. लागलीच घटनास्थळी वाशी पोलिस दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह वाशीच्या ग्रामीण रुग्णालयात नेला. याबाबत शनिवारी सकाळी मयत राहूलचे वडील रणजित फरताडे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 'The body of the son is lying in the ditch'; A midnight phone call brought grief to the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.