बाप तो बापच! मुलावरील चाकूचा वार बापाने झेलला, मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली

By बाबुराव चव्हाण | Published: May 15, 2023 05:56 PM2023-05-15T17:56:12+5:302023-05-15T17:56:51+5:30

तरुणाचा मुलासोबत वाद सुरु असल्याने वडीलमध्ये पडले

The father is the father! The father survived the knife attack on the son, but the fight to death failed | बाप तो बापच! मुलावरील चाकूचा वार बापाने झेलला, मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली

बाप तो बापच! मुलावरील चाकूचा वार बापाने झेलला, मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली

googlenewsNext

वाशी (जि. धाराशिव) : मुलावरील चाकूचा वार ६५ वर्षीय बापाने झेलला. पाेटामध्ये चाकू लागून गंभीररित्या जमखी झाल्यामुळे त्यांना तातडीने अंबेजाेगाई येथील रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांनी दम ताेडला. ही थरारक घटना वाशी तालुक्यातील मांडवा शिवारात रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित मारेकर्याविरूद्ध खुनाचा गुन्हा नाेंदविण्यात आला.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मांडवा येथील हणुमंत दिगांबर देशमुख याने १४ मे राेजी साधारपणे दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास रविकांत बबन देशमुख यांच्या शेतात जावून ‘‘तू माझ्या पत्नीकडे का पाहताेस’’, अशा शब्दात जाब विचारून वाद घालण्यास सुरूवात केली. ताे एवढ्यावरच थांबला नाही तर, खिशातील धारधार चाकू काढून रविकांत याच्यावर वार करणार इतक्यात त्याचे वडील बबन नारायण देशमुख (६५) आडवे आले. ‘‘अरे हणुमंता, हे काय लावलेस?’’ म्हणून विचारणा करताच आपल्या हातातील चाकू बबन यांच्या पोटात खुपसला. या घटनेत बबन देशमुख रक्ताच्या थाराेळ्यात पडले. यानंतर हल्लेखाेर हणुमंतने दुचाकीवरून पाेबारा केला. 

तोपर्यंत रविकांत यांने नातेवाईकांसह मित्रांना बोलावून रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या वडिलांना कळंब येथील रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढे अंबेजोगाई येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्याेत मालवली. या प्रकरणी मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पाेलीस ठाण्यात मारेकर्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपाेनि. सासणे हे करीत आहेत.

आराेपीला ठाेकल्या बेड्या...
खुनाच्या घटनेचे गांभीर्य ओळखून वाशी पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपाेनि. सासणे यांनी तपासाची चक्रे फिरविली. गुप्त माहितीच्या आधारे आराेपी हणुमंत दिगांबर देशमुख यास साेमवारी पहाटेच्या सुमारास मांडवा येथून जेरबंद करण्यात आले.

Web Title: The father is the father! The father survived the knife attack on the son, but the fight to death failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.