मराठा तरूण संतापले, जमिनीत गाडून घेत आंदाेलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 03:21 PM2023-10-29T15:21:59+5:302023-10-29T15:22:18+5:30

धाराशिव तालुक्यातील मेडसिंगा येथील संतप्त तरूणांनी जमिनीत गाडून घेत आंदाेलन केले. आक्षणाला विराेध करणाऱ्या नेत्यांचाही यावेळी निषेध नाेंदविला.

The Maratha youths were enraged, and buried themselves in the ground | मराठा तरूण संतापले, जमिनीत गाडून घेत आंदाेलन

मराठा तरूण संतापले, जमिनीत गाडून घेत आंदाेलन

मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचा आराेप करीत रविवारी धाराशिव तालुक्यातील मेडसिंगा येथील संतप्त तरूणांनी जमिनीत गाडून घेत आंदाेलन केले. आक्षणाला विराेध करणाऱ्या नेत्यांचाही यावेळी निषेध नाेंदविला.

मनाेज जरांगे पाटील पुन्हा उपाेषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावू लागली आहे. उपाेषणाचा पाचवा दिवस असतानाही सरकारने आरक्षणाचा प्रश्न साेडविलेला नाही. त्यामुळे आता मराठा तरूण संतप्त झाले आहेत. धाराशिव तालुक्यातील तरूणांनी रविवारी सकाळी स्वत:ला जमिनीत काडून घेत आंदाेलन केले. यावेळी मराठा आरक्षणविराेधी भूमिका घेतलेल्या राज्यातील नेत्यांच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी करीत निषेध नाेंदविण्यात आला. सरकार जाेपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न साेडवित नाही, ताेवर हा संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

काळे फासले...

राज्य शासनाकडून हाती घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या याेजनांच्या जाहिराती एसटी महामंडळाच्या बसेसवर करण्यात आल्या आहेत. या जाहिरातीलतील प्रधानमंत्री, मुख्यमंत्री तसेच दाेन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांवर चपलाने मारून काळे फासण्यात आले.

Web Title: The Maratha youths were enraged, and buried themselves in the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.