Video: कळंबमध्ये पुन्हा चाेरी; सिमेंट, टायरचे दोन दुकाने फोडून रोकड, साहित्य लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 14:40 IST2024-02-03T14:37:13+5:302024-02-03T14:40:51+5:30
काेयत्यांचा धाक दाखवून कळंब शहरातील पेट्राेलपंप लुटल्याची घटना चार-पाच दिवसांपूर्वीच घडली आहे.

Video: कळंबमध्ये पुन्हा चाेरी; सिमेंट, टायरचे दोन दुकाने फोडून रोकड, साहित्य लंपास
धाराशिव : पेट्राेलपंप लुटीची घटना ताजी असतानाच शनिवारी पहाटेच्या सुमारास कळंब शहरातील टायर तसेच सिमेंटचे दुकान फाेडून राेख रक्कम तसेच साहित्य लंपास केले. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काेयत्यांचा धाक दाखवून कळंब शहरातील पेट्राेलपंप लुटल्याची घटना चार-पाच दिवसांपूर्वीच घडली आहे. अद्याप या घटनेचा छडा लागलेला नसतानाच शनिवारी पहाटेच्या सुमारास परळी राेड भागातील दाेन दुकाने चाेरट्यांनी साफ केली. टायर आणि सिमेंटचे दुकान फाेडून राेकड तसेच साहित्य लंपास केले. चाेरीची ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर कळंब पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. चाेरट्यांचा माग शाेधण्यासाठी श्वान पथक ‘स्पाॅट’वर तैनात करण्यात आले हाेते.
कळंबमध्ये पुन्हा चाेरी; सिमेंट, टायरचे दुकान फाेडले #CrimeNews#Dharashivpic.twitter.com/9f5av8KHW8
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) February 3, 2024
दरम्यान, या पैकी एका दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हाेते. या कॅमेऱ्यात चार ते पाच चाेरटे कैद झाले आहेत. या फुटेजच्या आधारे पाेलीस चाेरट्यांच्या मागावर आहेत. या प्रकरणी दुपारी १ वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे किती राेकड आणि काेणकाेणते साहित्य चाेरीस गेले, हे स्पष्ट हाेवू शकले नाही.