चोऱ्या वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:34 AM2021-05-21T04:34:35+5:302021-05-21T04:34:35+5:30

कारवाईची मागणी लोहारा : तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीसह मटका, जुगार यासारखे अवैध धंदे वाढले आहेत. तरुण पिढी ...

Thefts increased | चोऱ्या वाढल्या

चोऱ्या वाढल्या

googlenewsNext

कारवाईची मागणी

लोहारा : तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीसह मटका, जुगार यासारखे अवैध धंदे वाढले आहेत. तरुण पिढी याच्या आहारी जात असून, पोलीस प्रशासनाने अशा धंद्यावर कारवाई करून याला आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

मोबाईल रेंज मिळेना

येणेगूर : उमरगा तालुक्यातील येणेगूरसह परिसरातील अनेक गावांत मोबाईलची रेंज मिळत नसल्याने मोबाईलधारक त्रस्त आहेत. कोरोनामुळे सध्या बहुतांश व्यवहार तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू आहे. मात्र, रेंज मिळत नसल्यामुळे यात अडथळा येत असल्याच्या तक्रारी आहेत.

गुटखा विक्री सुरूच

कळंब : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची शहरासह तालुक्यात विक्री सुरूच आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असले तरी पानटपऱ्या तसेच किराणा दुकानातून चोरट्या पद्धतीने जादा दराने याची विक्री सुरू असल्याचे चित्र असून, यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Thefts increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.