माणसांच्या जीवाला राहिले नाही मोल; महिनाभरात तब्बल ८ जणांचा झाला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:41 PM2022-04-08T12:41:40+5:302022-04-08T12:41:54+5:30

छोट्या-मोठ्या वादातून थेट खून पाडण्याचेच प्रकार सहज होताना दिसत आहेत.

There is no value left in human life; As many as 8 people were killed in a month | माणसांच्या जीवाला राहिले नाही मोल; महिनाभरात तब्बल ८ जणांचा झाला खून

माणसांच्या जीवाला राहिले नाही मोल; महिनाभरात तब्बल ८ जणांचा झाला खून

googlenewsNext

उस्मानाबाद : उन्हाच्या पर्यायासोबतच माणसांच्या डोक्याचा पाराही हल्ली चांगलाच वाढलेला दिसत आहे. छोट्या-मोठ्या वादातून थेट खून पाडण्याचेच प्रकार सहज होताना दिसत आहेत. यातूनच उस्मानाबाद जिल्ह्यात मागील महिनाभरात तब्बल ८ जणांचा खून झालेला आहे.

पती-पत्नीत चालणारी कुरबूर नवी नाही; पण या कुरबुरीतून रांजणी येथील मंगल विठ्ठल संगापुरे या महिलेचा त्यांच्या पतीनेच कोयत्याने वार करून खून केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी झाला. सतत मद्यपान करणाऱ्या पित्यासोबत झालेल्या वादानंतर मुलानेच डोक्यात दगड घालून कोथळा येथील अच्युत भागवत शिंदे यांचा खून केला. भातागळी येथील अक्षय जयवंत जगताप या २५ वर्षीय तरुणाचा घरगुती वादातून तिघांनी मारहाण करुन खून केल्याचा प्रकारही गत महिन्यातच समोर आला. करवंजी येथील प्रभावती भीमराव बेडगे या महिलेचाही जुन्या वादातून कोयत्याने वार करून खून झाला. किरकोळ वादातून मांडवा येथील युवराज त्रिंबक पाटील यांचा गळा आवळून खून करीत प्रेत तलावात फेकून दिल्याची घटना गावातील एका व्यक्तीने घडवून आणली. 

गावातीलच मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून गुंजोटी येथील जावेद सिराज काझी या तरुणाचा खून झाल्याचा आरोपही मागच्याच महिन्यात झाला होता. परभणी जिल्ह्यातील संजय नामदेव गायकवाड यांचा खून करून त्यांचा मृतदेह ढोकी-तेर रस्त्यालगत टाकून देण्यात आला. तर ढोकी येथील कृष्णा शिवशंकर कोरे या २३ वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी खून करून त्याचा मृतदेह गडदेवदरीजवळ गवतात फेकून दिला. या घटना लक्षात घेता जवळपास तीन ते चार दिवसांआड उस्मानाबाद जिल्ह्यात एकाचा खून होत असल्याचे समोर येत आहे.

Web Title: There is no value left in human life; As many as 8 people were killed in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.