जिल्ह्यात चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:21 AM2021-07-12T04:21:16+5:302021-07-12T04:21:16+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. घरफाेड्या, वाहन चाेरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे ...
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. घरफाेड्या, वाहन चाेरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ताकविकी, कराळी, आरणी येथील घरे, तसेच दुकानातील लाखाेंचा ऐवज चोरांनी लंपास केला. याप्रकरणी त्या-त्या पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, लाेहारा तालुक्यातील आरणी येथील खंडेराव खराेसे यांच्या बंद घराचा दरवाजा ताेडून चोरांनी आत प्रवेश केला. ७० ग्रॅम साेन्याचे दागिने, ६० ग्रॅम चांदी व मनगटी घड्याळ चाेरून नेले. ही घटना समाेर आल्यानंतर खंडेराव खराेसे यांनी लाेहारा पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरगा तालुक्यातील कराळी येथील किराणा दुकान चाेरट्यांनी साफ केले. चाेरट्यांनी दुकानाच्या दरवाजावरील कडी-काेयंडा ताेडून आत प्रवेश केला. यानंतर यातील १ हजार ६०४ रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी दत्ता जाेगदंड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ताकविकी येथील आपले सरकार केंद्रातही चाेरी झाली आहे. चाेरट्यांनी पत्रा उचकटून आत प्रवेश केला. हा प्रकार केंद्रचालक जमीर शेख यांच्या निदर्शनास आला. यावेळी त्यांनी आरडाओरड केली असता चाेरट्यांनी दुकानातील प्रिंटर बाजूला ठेवून लॅपटाॅप घेऊन पसार झाले. याप्रकरणी बेंबळी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाैकट..
ट्रॅक्टरची ट्राॅली नेली, गुन्हा दाखल
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील तुगाव येथील विश्वनाथ बिराजदार यांनी ट्रॅक्टरची ट्राॅली येणेगूर शिवारातील शेताजवळ साेडली हाेती. दरम्यान, परिचयातील दाेघांनी बिराजदार यांची ट्राॅली वापरण्यास म्हणून चाेरून नेली. ही बाब समाेर आल्यानंतर बिराजदार यांनी मुरूम पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.